पंतप्रधानांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या काही भागातील पूर परिस्थितीबद्दल जाणून घेतली माहिती

नवी दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून राज्याच्या काही भागातील पूर परिस्थितीबद्दल माहिती घेतली. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी केंद्राकडून शक्य त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले.

आपल्या टिवटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्याशी बोललो आणि राज्याच्या काही भागातील पूर परिस्थितीबाबत माहिती घेतली . पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. पूरग-स्त भागात राहणार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.. ‘

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!