सोने-चांदी दरात घसरण
नवी दिल्ली,
मागील काही दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने वायदे भाव चार दिवसांच्या तेजीनंतर 0.55 टक्क्यांनी घसरला असून 47,360 रुपये प्रति 10 ग-ॅम आहे. तर चांदी वायदे भाव 0.7 टक्के घसरला असून 63,051 रुपये प्रति किलोग-ॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे आज सोने दरात घसरण झाली आहे.
भारतीय बाजारातील सोने-चांदी दर आणि बुलियन इंडेक्स फ्यूचर्स विदेशी किमती पाहता मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर ऑॅक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. र्श्ण्ें वर ऑॅक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. सोने दर 47,450 ते 47,300 हजारपर्यंत असेल. तर सप्टेंबरमध्ये चांदी 62500 रुपयांवर 63,200 ते 63,900 पर्यंत असेल.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.