उत्तर प्रदेशातील किशोरवयीन मुलाने प्राचार्यवर बंदूक रोखली, गुन्हा दाखल
बिजनौर(उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातून हैरान करणारी एक घटना समोर आली असून भगूवालातील राजकिय इंटर कॉलेजमध्ये मंगळवारी एका 17 वर्षीय युवकाने प्राचार्यांच्या डोक्याला बंदूक लावली आणि त्यांना शिव्या दिल्या. प्राचार्यानी मुलांला घातलेल्या कपडयांवरुन फटाकारले होते.
प्राचार्यानी शाळेच्या परिसरामध्ये एक मुलाला वाढविलेले लांब केस आणि हातांच्या बोटांमध्ये अंगठया घातलेले पाहिले व तो विना ड्रेसचा होता यानंतर प्राचार्यानी त्याला फटकारले. ज्यावेळी शिक्षक प्राचार्याच्या कॅबिनेमध्ये गेले तर किशोर तेथून फरार झाला परंतु नंतर माहिती पडले की हा किशोर येथील विद्यार्थी नव्हता.
प्राचार्य पंकज कुमारने म्हटले की प्रार्थनेनंतर ज्यावेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या वर्गात गेले असता हा मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली व मला शिव्या देऊ लागला. ज्यावेळी शिक्षकांनी त्याच्याकडे रिव्हॉल्वर पाहिली तर त्यांनी त्याचा पाठलाग केला परंतु तेथून पळून गेला.
चौकशी केल्यानंतर माहिती पडले की तो एक बाहेरील व्यक्ती होता आणि शाळेत शिकत नव्हता. प्राचार्यानी म्हटले की मी त्यांच्या विरोधात मंडावली ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मुलगा करौली गावाचा रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. तो सकाळच्या प्रार्थनेत कशामुळे सामिल झाला होता हे मात्र अजून माहिती पडले नाही. बिजनौरचे पोलिस अधीक्षक (एसपी) धर्मवीर सिंहनी सांगितले की आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत आणि आरोपीला पकडले