कोविड- 19 बाबत अद्ययावत माहिती

नवी दिल्ली –

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 58 कोटी 89 लाख  मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासांत 25,467  नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली

सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 0.98%  इतकी  म्हणजेच मार्च 2020 पासूनची आतापर्यंतची सर्वात कमी रुग्णसंख्या

देशात सध्या 3,19,551 कोविड बाधित  रुग्ण आहेत, ही गेल्या 156  दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे

रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजे 97.68 टक्के  आहे

गेल्या 24 तासांत 39,486 रुग्ण  कोरोनामुक्त झाले; आता एकूण रोगमुक्तांची संख्या 3,17,20,112 आहे

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर ( (1.90% ) असून गेल्या 60 दिवसांपासून  3% हून कमी

दैनंदिन  पॉझिटीव्हिटी दर(1.55 %) गेले 29 दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 93 लाख चाचण्या करण्यात आल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!