Sanchy Education Society संचलित – ई देसी बाजार महिला बचत गटांसाठी आशेचे किरण..
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार – प्रशांत पाटील. ई देसी बाजार रावेर तालुका समन्वयक
प्रतिनिधी – प्रमोद कोंडे
महिला बचत गटामार्फत तयार होणाऱ्या उत्पादनाला बाजार पेठ उपलब्ध होतं नाही, परिणामी त्यांना कमी उत्पन्नात समाधान मानावे लागते,ई देसी बाजार या सर्व उद्योजकांना ऑनलाईन तथा ऑफलाईन मध्यामा द्वारे संपूर्ण भारताची व्यापारी बाजार पेठ उपलब्ध करून देऊन त्यांना जास्तीत जास्त ऑर्डर मिळवून देण्यासाठी पूर्ण मदत करते, सोबतच महिलांना नव नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेग वेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देते, त्यांच्या उत्पादनाला चांगल्या प्रतीचे पॅकिंग आणि जाहिरात देखील देते, जे ने करून या सर्व माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि या सर्व महिला सक्षम होतील,
ई देसी बाजार संपूर्ण भारताच्या गृह उद्योग / शेतकरी / कारिगर / लघु उद्योजक आणि मुख्य करून बचत गट यांच्या मदती साठी, देशाच्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात आपल्या समन्वयक यांच्या सोबत मिळून काम करीत आहे,
या संदर्भाची माहिती प्रशांत पाटील (ई देसी बाजार रावेर तालुका समन्वयक) यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना माहिती पत्र दिले, त्या प्रसंगी सोबत पं.स.सभापती पती हरलालभाऊ कोळी, जि.प.सदस्य पी.के. महाजन, पं.स. सदस्य विश्वनाथ भाऊ कोळी हे उपस्थित होते.