भडगाव येथे दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्यासाठी शिबिरात २५० जणांची तपासणी. अपंग व दिव्यांग व्यक्तींना न्याय देऊ.आमदार किशोर पाटील यांचे आश्वासन.
भडगाव वार्ताहर —
या आरोग्य शिबिरात अपंग व दिव्यांग व्यक्तींची तपासणी झाल्याप्रमाणे व गरजेप्रमाणे आमदार निधीतुन विविध साहीत्याचा लाभ मिळवुन देउ. लहान बालकांना बोलता येत नसेल , दिसत नसेल अशा बालकांवर मुंबई, पुणे सारख्या तज्ञ डाॅक्टरांकडुन उपचार करण्यात येतील. तसेच अपंग व दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनेतुन दर महीन्याला अर्थसहाय्य मिळवुन देण्याचा प्रयत्न करु. अपंग व दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवुन देऊ. असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी भडगाव येथे बोलतांना दिले. ते आमदार आयोजीत अपंग व दिव्यांग तपासणी शिबिरात उदघाटनप्रसंगी बोलत होते. या शिबिराचे उदघाटन आमदार किशोर पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सुञसंचलन विधानसभा क्षेञप्रमुख जे के पाटील यांनी केले. समाजकल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी यांनी या शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील, विधानसभा क्षेञप्रमुख जे के पाटील, तालुका प्रमुख डाॅ. विलास पाटील, शहर प्रमुख योगेश गंजे, पंचायत समिती सभापती डाॅ. अर्चना पाटील, नुतन उपसभापती रावण भिल्ल, सदस्य रामकृष्ण पाटील, युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, अल्पसंख्यांक सेलचे ईम्रानअली सैय्यद, शिवसेना उपतालुका प्रमुख रतन परदेशी, डाॅ. विशाल पाटील, संजय पाटील, विजय पाटील, युवासेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील, शहर प्रमुख निलेश पाटील, शेतकरी संघाचे संचालक नागेश वाघ यांचेसह पदाधिकारी, नागरीक, महीला मोठया संख्येने हजर होते.हे शिबीर भडगाव येथील शिवसेनेच्या कार्यालयात दि. १३ रोजी सकाळी ११ वाजेपासुन सायंकाळपर्यंत सुरु होते.
आमदार किशोर पाटील यांच्या आमदार विकास निधीतुन पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहाय्यक साहीत्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शहरासह तालुक्यातील २५० नागरीकांसह महीलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी झालेल्या अपंग व दिव्यांग व्यक्तींना सायकलींसह वस्तु आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आयोजीत कार्यक्रमात वाटप करण्यात येणार आहेत. या शिबिरात जिल्हा समाजकल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी, जिल्हा रुग्णालयाचे डाॅ. अर्मात वाघदे, जयपुर फ्रुट तज्ञ मुंबई शेरसिंग राठोड व त्यांची संपुर्ण टीम, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अधिकारी एस पी गणेशकर, सायक्लोलाॅजीस्ट सुवर्णा चव्हाण आदिंनी नागरीकांची आरोग्य तपासणी केली. तसेच दि. १४ रोजी पाचोरा येथे महालपुरे मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या तपासणी शिबिराचाही लाभ घेण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. या दोघ शिबिरातील अपंग व दिव्यांग व्यक्तींना पुढील प्रमाणे तपासणीनुसार साहित्य उपकरणे वाटप करण्यात येणार आहेत. यात उदा. तिनचाकी सायकल, व्हीलचेयर, कुबड्या, वॉकर, काठी, जयपुर फुट, कॅलीपर्स, कर्णयंत्रे इ. उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
शिबिरातंर्गत लाभार्थ्यांची तपासणी झाल्यानंतरच पात्र दिव्यांग व्यक्तीस साहित्य उपलब्ध करण्यात येणार आहे.