आमच्याकडे विजयाची संधी आहे हे आम्हांला माहिती होते – कोहली
नॉटिघम
8ऑगस्ट
भारतीय संघाला माहिती होते की इंग्लंड विरुध्द जिंकण्यासाठी आज त्यांना एक संधी आहे असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
इंग्लंड विरुध्दचा येथील ट्रेंट बि-जमध्ये खेळण्यात आलेला पहिला कसोटी सामना हा पाचव्या व शेवटच्या दिवशी पावसामुळे खेळण्यात येऊ न शकल्याने अनिर्णीत राहिला.
इंग्लंडने भारताला विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य दिले होते आणि भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ समाप्तीच्या वेळी एक गडी गमवून 52 धावा केल्या होत्या. तसेच संघाला विजयासाठी अजून 157 धावांची गरज होती. परंतु पाचव्या दिवशी खेळ पावसामुळे होऊ शकला नाही आणि भारताच्या विजयाची आशा धुळीला मिळाली.
कोहलीने म्हटले की आम्हांला तिसर्या आणि चौथ्या दिवशी पावसाची आशा नव्हती परंतु पाऊस पाचव्या दिवशी झाला. आम्ही येथे खेळण्याचा आनंद घेत होतोत. आम्ही मजबूत सुरुवात करु इच्छित होतो. पाचव्या दिवशी आम्हांला माहिती होते की आमच्याकडे संधी आहे. आम्हांला वाटत होते की आम्ही सामन्यावर पक्कड निर्माण केली आहे. पहिल्या डावात आघाडी घेणे महत्वपूर्ण होते परंतु शर्माची गोष्ट ही आहे की पाचव्या दिवशी सामना समाप्त करु शकलो नाहीत.
त्याने म्हटले की आम्ही फक्त सामन्याला वाचविण्यासाठी खेळू इच्छित होतोत. आमचे लक्ष्य याला जिंकणे होते. आम्ही जी आघाडी घेतली होती ती खूप महत्वपूर्ण होती. खेळपट्टीची स्थिती आणि गती पाहिला मिळत होती. परंतु या संघाने लयला कायम ठेवले होते. भारत आणि इंग्लंडमध्ये मालिका सतत ब्लॉकबस्टर होते आहे आणि आम्ही पुढील कसोटीसाठी तयार आहोत.