ऑॅफिसला येण्यासाठी मायक्रोसॉफ्टने कर्मचार्यांसमोर ठेवली ही अट
वॉशिंग्टन
5 ऑगस्ट
अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच गुगल, फेसबुकपाठोपाठ ऑॅफिसला येण्यासाठी मायक्रोसॉफ्टनेही अट ठेवली आहे. दरम्यान, कर्मचारी आणि विक्रेत्यांना ऑॅफिसमध्ये येण्यापुर्वी लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक केले आहे. अमेरिकेत मायक्रोसॉफ्टचे ऑॅफिस पुढील महिन्यात पुर्णपणे सुरु होणार होते.
सर्व कर्मचारी, विक्रेते आणि अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कार्यालयामध्ये प्रवेश करणार्या कोणत्याही कर्मचारी, ग-ाहक यांना लसीकरणाचा पुरावा आम्हाला दाखवणे बंधनकारक राहील. तसेच कर्मचार्यांसाठी राहण्याची व्यवस्था असेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
कंपनीने लसीकरणाच्या पुराव्याबाबत नवीन निर्देशाव्यतिरिक्त, आपली कार्यालये पूर्णपणे उघडण्याची मुदत वाढवली आहे. यापूर्वी 7 सप्टेंबरपर्यंत असे करण्याचे नियोजन केले असताना, मायक्रोसॉफ्ट आता 4 ऑॅक्टोबरनंतरच आपली यूएसमधील कार्यालये पूर्णपणे उघडेल. तसेच मायक्रोसॉफ्टने असेही म्हटले आहे की, जे कर्मचारी लहान मुलांचे पालक आहेत, जे लसीकरण करू शकत नाहीत, ते पुढील वर्षी जानेवारीपर्यंत घरून काम करू शकतील.
कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, नवीन घडामोडींचा आम्ही बारकाईने मागोवा घेतो आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतो. साथीच्या प्रारंभापासून आम्ही असे केले आहे. मायक्रोसॉफ्ट कार्यालयात येण्यासाठी लसीकरणाचा पुरावा दाखवण्याची योजणा आखली आहे. यापुर्वी गुगल आणि फेसबुकने त्यांच्या कर्मचार्यांसाठी गेल्या महिन्याच्या अखेरीस याची घोषणा केली.
दोन्ही टेक दिग्गजांनी त्यांची कार्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी अपेक्षित तारखा पुढे ढकलल्या आहेत. कार्यालये काहींसाठी खुली असली तरी, कंपन्यांकडे स्वैच्छिक वर्क-फ्रॉम होम पॉलिसी आहे ज्या अंतर्गत कर्मतारी त्यांच्या घरातून काम करु शकतात.