ऑलिम्पियन प्रवीण जाधव कुटुंब सातारा जिल्हा सोडणार, बारामतीला स्थायिक होणार?

सातारा प्रतिनिधी

3 ऑगस्ट

गरीब कुटुंबातून देशासाठी टोकियो ऑॅलिम्पिक स्पर्धेमधेमध्ये धनुर्विद्या पात्र ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रविण जाधवने देशपातळीवर देशाचे नाव झळकवले. मात्र त्याच्या या कुटुंबाची त्रेटात्रिपट झाल्याच चित्र सध्या दिसू लागलय. गावातील काही टग्यांनी दिलेल्या त्रासामुळे हे कुटुंब बारामतीला कायमच स्थाईक होण्याच्या तयारीत आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालूक्यातील सरडे या गावात राहणारे हे पती पत्नी आहेत. झोपडीत राहणार्‍या संगिता आणि रमेश जाधव या दाम्पत्याचा मुलगा म्हणजेच प्रविण जाधव. याच दगड मातीत खेळता खेळता त्याने स्पोर्टस्मध्ये अस काही नावलौकिक मिळवलं की, चक्क संपुर्ण देशाच लक्ष प्रविणकड गेले. टोकियो ऑॅलिम्पिक पर्यंतची मजल मारली खरी मात्र इकडे या कुटुंबाच जेसीबीने घरच उद्ध्वस्त करण्याची धमकी काही गाव गुंडांनी दिली.

 प्रविणचे आजोबा शेतीमहामंडळात कामाला होते. नोकरी गेल्यानंतर त्यांचा संसाराचा कोठेच ठाव ठिकाणा नव्हता. शेती महामंडळाकडू आज ना उद्या रहायला घर मिळेल जमिन मिळेल या आशेवर प्रविणचे वडिल शेती महामंडळाच्या जागेत पाल टाकून रहात होते. पाच बाय सातच्या पालत राहाणार्‍या रमेशला एक मुलगा ..प्रविण जाधव… प्रविण खेळात चपळ होता. शिक्षकांनी ते हेरल आणि प्रविणला मिळालेल्या मार्गदर्शनावर तो आज या ऑॅलिम्पिकपर्यंत पोहचला. भारताच्या शिरपेचातील तुराच… प्रतिकुल परिस्थितीवर मजल मारलेल्या प्रविणच कौतुक संपुर्ण देश करत होताच शिवाय पंतप्रधानांकडूनही त्याचं खास कौतुक झाले. एका बाजूला कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मात्र प्रविणचे घर पाडण्यासाठी गावातले गावगुंड तयारीला लागले होते.

या कुंटुंबाला शेतजमिन देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर काम करत असतानाच यांना नव्याने मिळत असलेल्या जागेवर घर बांधू न देण्यासाठी धमकी देण्यात आली. या बाबत जेव्हा फलटण तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ नितिन सावंत यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी गावात जाऊन दोन गाव गुंडांना बरड ओपी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांचा दंडुका बघितल्यावर दोघेही गुडघ्यावर आले आणि आपण प्रविणच्या आईवडिलांना त्रास देणार नसल्याचे पोलिसांना लेखी दिले. सावंत यांच्या सोबत फोनवर संपर्क साधल्यानंतर हा वाद संपुष्टात आला असल्याचे त्यांनी सांगितले. वाद संपुष्टात आला असलातरी प्रशासकिय यंत्रणेने या कुटुंबावर खर्‍या आर्थाने लक्ष देऊन नुसती जागा न देता त्यांना ते बांधूनच द्यावे असा सर्वच स्थरावर मागणी होताना दिसत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!