जळगाव पाटबंधारे विभागातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अभियंता एस.एच.चौधरी सेवानिवृत्त.

यावल दि.1 -(सुरेश पाटील)

जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील हतनुर धरण उपविभाग यावल येथील उपविभागीय अभियंता एस. एच.चौधरी यांनी आपल्या पाटबंधारे विभागात एकूण39वर्ष यशस्वीरित्या आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा केली असे हे कर्तव्यदक्ष अधिकारी दि. 31जुलै2021शनिवार रोजी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांना जळगाव पाटबंधारे विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गासह सर्व स्तरातील हितचिंतकांनी प्रेम पूर्वक आणि आदरपूर्वक निरोप देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एस.एच.चौधरी कनिष्ठ अभियंता म्हणून सन1983मध्ये मेरी नाशिक येथे शासकीय सेवेत हजर झाले होते,मेरी मध्ये असताना त्यांनी मोठमोठ्या धरणांमध्ये पी जो मीटर बसविण्याचे काम केले ज्यामुळे पाण्याचे प्रेशर मोजता येते याबाबत त्यांनी सिन्हा प्रोजेक्ट भिरा प्रोजेक्ट काही विदर्भातील धरण येथे प्रत्यक्ष बसवून दिले त्यानंतर त्यांची शासकीय बदली सर्वेक्षण उपविभाग क्रमांक1 जळगाव येथे सन1988मध्ये झाली,या उपविभागात मध्ये असताना त्यांनी हरीपुरा,निंबादेवी,वाघझिरा,वड्री धरण तसेच बोरखेडा या ल.पा. प्रकल्पांचे सर्वेक्षण करून त्यास प्रशासकीय मान्यता आणली त्यानंतर या उपविभागात त्यानी जवळपास70पाझर तलाव30 बंधारे व7ल.पा.प्रकल्पांचे सर्वेक्षण केले आज त्यानी केलेले सर्व प्रकल्प पूर्ण झालेले असून सन 1994नंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव कडा अंतर्गत जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत पाचोरा, चोपडा,यावल,व सावदा या उपविभागा मध्ये शाखा अभियंता म्हणून काम केले त्यानंतर त्यांची बदली गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत एरंडोल येथे झाली त्याच्या कार्यकाळात गिरणा धरण सन2006 ते 2011पर्यंत पूर्ण भरलेले होते हा ऐतिहासिक क्षण त्यांच्या जीवनात आला मग नागडोली शाखा तसेच पाळधी एक व दोन शाखांमध्ये काम केले त्यामध्ये जवळ जवळ सिंचनाचे उद्दिष्ट व भिजलेले क्षेत्र यांचे शंभर टक्के प्रमाणे पूर्तता केली त्यानंतर त्यांची बदली शासकीय आदेशानुसार परत जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत सावदा येथे झाली यामध्ये त्यांनी सुकी शाखा खिरोदा व उटखेडा व मुक्ताईनगर शाखा येथे काम केले या ठिकाणी सुद्धा त्यांनी दिलेल्या उद्दिष्टा प्रमाणे 80ते90टक्के वसुली करून शासनाच्या सर्व नियम पाळून शेतकऱ्यांना नियमित पाणी दिले आहे त्यानंतर सन2016मध्ये त्यांचे उपविभागीय अभियंता म्हणून प्रमोशन झाले व त्यांचीं नियुक्ती पाटबंधारे उपविभाग यावल येथे करण्यात आली या उपविभाग अंतर्गत हतनुर कालवा तसेच11बिगर सिंचन संस्था यामध्ये बीटीपीएस टप्पा1व2 तसेच आरपीडी भुसावळ मध्य रेल्वे,भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी, नगरपालिका भुसावळ,यावल, कठोरा ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना,ममुराबाद व6गावे पाणी पुरवठा योजना,भादली पाणी पुरवठा योजना,कंडारी पाणीपुरवठा योजना इत्यादी संस्थेचे दर महिन्याचे पाणीवापर देऊन त्यांची शासनाच्या निकषाप्रमाणे पाणीपट्टी आकारून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत एकूण 1 अब्ज4कोटी बिगर सिंचनाचे वसुली केलेली आहे.जळगाव जिल्ह्यात एकही अभियंता नसताना त्यांनी उपलब्ध क्लास3 व क्लास4या कर्मचाऱ्यांना घेऊन वरील वसुली केलेली आहे व तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत हे एकमेव उपविभाग असून आज पर्यंत इतकी बिगर सिंचन वसुली कुठे झालेली नाही त्यानंतर सन2020नोव्हेंबर अखेर या उपविभागाकडे वाघूर प्रकल्प सिंचन नियोजनासाठी हस्तांतरित करण्यात आला वास्तविक कोणतेही अभियंता व कर्मचारी उपलब्ध नसताना शासनाच्या आग्रहास्तव सदर प्रकल्प या उपविभागाच्या सिंचन शाखा भुसावळला जोडण्यात आला या प्रकल्पावर प्रथमच जळगाव महानगरपालिका यांचेकडे साडे आठ कोटी रुपयाची थकबाकी असताना गेल्या चार वर्षाच्या अंतरात2कोटी48लाख रुपयाची वसुली जळगाव महानगरपालिका यांच्याकडून केली तसेच त्यांच्या कार्यकाळात बिगर सिंचन संस्थांचे जे काही पाणीपट्टी मध्ये तफावत होती त्यामध्ये मार्ग काढून सदर संस्थांचे नियमित करारनामे करण्यात आले त्यामुळे या संस्थांवर शासनाचे केलेल्या करारनाम्यामुळे पूर्ण बंधने लागू झाल्यामुळे त्यांचेवर नियमित पाणी पट्टी शासनास जमा करण्याबाबत शासनाचा हक्क प्रस्थापित झाला व त्या संस्थांनी सुद्धा उपविभागाशी सतत संपर्क साधून नियमित पाणीपट्टी जमा केलेली आहे त्याची शासकीय सेवा38वर्ष 9महिने18दिवस इतकी झाली ते हजर झाले तेव्हा कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते त्यानंतर त्यांनी AMIE ही परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले त्यानंतर वयाच्या45व्या वर्षी शासनाच्या आदेशानुसार त्याची तोंडी एमपीएससीची मुलाखत घेण्यात आली त्यामध्ये त्यांची रँकिंग90आले व ते पदोन्नतीसाठी पात्र झाले म्हणूनच त्यांना सन 2017मध्ये उपविभागीय अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून दि.31जुलै2021रोजी ते सेवा निवृत्त झाले त्याबद्दल त्यांचे जळगाव पाटबंधारे जळगांव विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गातर्फे स्नेहपूर्ण निरोप देण्यात आला व उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!