इंधन दर वाढ निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत यावल तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन.

यावल – दि. 21 – प्रतिनिधी

दि.20रोजी सकाळी10 वाजेला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मिटिंग अयोजित करण्यात आली होती.त्यानंतर प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सूचनेप्रमाणे व जिल्ह्या राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा जि.प सदस्य रवींद्र पाटील यांचे नेतृत्वाखाली यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वाहन ढकल यावल तहसिल ऑफिस मध्ये नायब तहसीलदार राहुल सोनवणे व नायब तहसीलदार मुकतार तडवी यांना निवेदन दिले सदर निवेदन केंद्र सरकारच्या विरेधात निषेधार्थ पेट्रोल,डिझेल,घरगुतीगॅस, खाद्यतेल इत्यादी जीवन आवश्यक वस्तू केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे.संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दि.20रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले या प्रसंगी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सहभागी झाले होते यात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्ह्याअध्यक्ष रवींद्र पाटील, अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील,शहर युवक अध्यक्ष हितेंद्र गजरे,जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील,जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, तालुका समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, समाधान पाटील,राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश करांडे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष राकेश सोनार, राहुल चौधरी,धनराज फालक,समीर तडवी,विजय भोई,भरत भोई, छत्रपती फाउंडेशन संचालक गिरीश पाटील,तात्या कोळी, यशवंत अडकमोल,युवराज भास्कर पाटील,कैलास अडकमोल,पटेल,शुभम विटवे, चंद्रकांत कोळी,मुस्‍तुफा तडवी, आदींसह तालुक्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.

_______________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!