महाराष्ट्रात प्रथमच यावल तालुक्यात स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत एकाच दिवशी 15 गावांतुन 3 टन कचरा संकलन.
नेहरु युवा केंद्राचा स्तुत्य उपक्रम.
यावल – दि.15 प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र जळगाव,जिल्हा प्रशासन व यावल किसान प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत यावल तालुक्यात दि.13ऑक्टोंबर 2021रोजी सकाळी7ते10 वाजेच्या दरम्यान15गावांतुन यावल तालुका प्रशासन व यावल फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या सहकार्याने नेहरू युवा केंद्र समन्वयक तेजस पाटील व यावल फार्मर प्रोड्युसर कंपनी संचालक योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुक्यातील15गावांमध्ये एकाच वेळी स्वच्छ्ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. संपूर्ण तालुक्यातून 3 टन कचरा गोळा करण्यात आला.
या कार्यक्रमाला यावल तालुका तहसीलदार महेश पवार साहेब,यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी,यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा ऑफिसर नरेंद्र डागर,अकांटट अजिंक्य गवळी सर व यावल फार्मर प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष ज्योत्स्ना पाटील व उपाध्यक्ष मुकुंदा चौधरी तसेच सल्लागार दीपक पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले.स्वच्छ्ता अभियान कार्यक्रम पुढील गावांमध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.कोरपावली येथे मिलिंद महाजन व ग्रामस्थ,यावल शहरात गणेश पाटील सर व ग्रामस्थ,बामणोद येथे हेमराज ढाके व ग्रामस्थ, सावखेडा येथे संचालक निलेश पाटील व ग्रामस्थ,वड्री येथे निवृत्त कृषी पर्यवेक्षक ए.टी.चौधरी व ग्रामस्थ,डोनगाव येथे विजय पाटील व ग्रामस्थ,विरावली येथे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ तुषार पाटील,भूषण पाटील,हेमंत पाटील,विश्वनाथ पाटील,महेंद्र पाटील,धनराज पाटील, विजयसिंग पाटील,मेहबूब तडवी, दामू अडकमोल,व ग्रामस्थ, आमोदा येथे वासुदेव पाटील सर, ललित महाजन सर तसेच आमोदा गावचे ग्रामस्थ,न्हावी येथे मुकुंदा चौधरी,उपसरपंच उमेश बेंडाळे, न्हावी ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी राजेंद्र महाजन व नेहरू युवा केंद्र समन्वयक पल्लवी तायडे,पाडळसा येथे राज चौधरी व ग्रामस्थ,चितोडा येथे रमेश तायडे व महिला वर्ग व ग्रामस्थ, दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल,उपसरपंच किशोर महाजन व ग्रामस्थ,पिंपरुड येथे सरपंच कोळी,विपुल चौधरी, भाग्येश राणे,सौरभ चौधरी आणि ग्रामस्थ,किनगाव येथे धीरज पाटील,सचिन पाटील व ग्रामस्थ, बोरखेडा ग्रामस्थ सरपंच तळेले सर,ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रगतिशील शेतकरी अतुल तळेले यांनी कार्यक्रम यशस्वी केला.या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात प्रथमच एकमेव यावल तालुक्यात एकाच वेळी इतक्या गावांमध्ये स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात आला आहे.3टन कचरा गोळा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे स्वच्छ्ता करण्यात आली तसेच स्वच्छते बाबत गावांमध्ये जनजागृती करण्यात आली.या सर्व कार्यक्रमाचा समारोप यावल तहसील कार्यालयात करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार आर. के.पवार,आर.डी.पाटील,लिपिक संतोष पाटील राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजितसिंग राजपूत,नेहरू युवा केंद्र समन्वयक तेजस पाटील व पल्लवी तायडे,यावल फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष ज्योत्स्ना पाटील,सल्लागार दीपक पाटील,उपाध्यक्ष मुकुंदा चौधरी, संचालक योगेश चौधरी,संचालक कुणाल कोल्हे,संचालक प्रतीक वारके,संचालक निलेश पाटील, संचालक गोकुळ पाटील,प्रमोटर दिग्विजय पाटील,प्रमोटर महेश पाटील,भूषण पाटील,दिगंबर चौधरी आदी उपस्थित होते. राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजित सिंग राजपूत व दीपक पाटील सर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.नेहरू युवा केंद्र समन्वयक तेजस पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
______________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर