यावल पोलीस व कोर्टात तक्रार केल्याच्या कारणावरून अव्वल कारकून मुक्तार तडवी यांना शिवीगाळ,मारहाण करणाऱ्या3जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

यावल – दि.10 – तालुका प्रतिनिधी- ( सुरेश पाटील )

यावल पोलीस व कोर्टात तक्रार केल्याच्या कारणावरून यावल तहसील कार्यालयातीलअव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी यांना

शिवीगाळ मारहाण करणाऱ्या3जणांविरुद्ध यावल पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी यांनी यावल पोस्टेला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझे घराचे मागचे बाजूस राहणारे सुभान समशेर तडवी व त्यांचे कुटुंब त्यांच्यात व आमच्यात वाद सुरू असून सदरचे खटले न्यायप्रविष्ट आहे बुधवार दि.8रोजी सकाळी10:30 वाजेच्या सुमारास मी मोटरसायकलने सुभान जमशेर तडवी यांच्या घरासमोरून जात असताना सुभान तडवी,जैतून सुभान तडवी,व त्यांचा मुलगा तसलीम सुभान तडवी असे तिघांनी मला पाहून शिवीगाळ करून सुभान जमशेर तडवी व तस्लीम सुभान तडवी या दोघांनी मला दगड फेकून मारले त्यामुळे मी घाबरून जाऊन तेथे थांबला. त्यावेळेस ते तिघे मला म्हणाले की तुम्ही आमचे विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला व यावल कोर्टात खोट्या तक्रारी करतात असे म्हणून तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही असा दम दिला त्यावेळेस मला व त्यांनी मला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिविगाळ केली व जैतून सुभान तडवी हिने तिचे पायातील चप्पलने मला मारहाण केली त्यावेळेस सुभान जमशेड तडवी याने त्याचे घराबाहेर पडलेली काठी घेऊन मला पाठीवर तसेच डावे हाताचे खांद्यावर मारल्याने मला मुका मार लागला आहे. त्यावेळेस सदरचे भांडण सायबु हसन तडवी,सब्नुरबाई सायबु तडवी,पंकज दिलदार तडवी अषांनी प्रत्यक्ष सोडविले आहे. मला मार लागला असल्याने मला त्रास होत असून औषध उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात गेलो.या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला सुभान जमशेर तडवी जैतून सुभान तडवी तसलीम सुभान तडवी राहणार लोकेशनगर यावल यांच्याविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला भाग.5 गु.र.नं.160/2021भा.द.वी.37,323,504,506,34प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास ए.एस.आय नेताजी वंजारी हे करीत आहेत.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण यावल तालुक्यातील बातमी 9822485311 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
सुरेश पाटील
यावल तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9822485311

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!