यावल तालुक्यात शौचालयात खादाड सामुदायिक रित्या घेताहेत टक्केवारीचा स्वाद..!
भ्र.वि.जन आंदोलन न्यास, जनसंसद समिती आणि आरपीआय आंदोलन करणार.
यावल तालुका प्रतिनिधी – दि.28( सुरेश पाटील mob.- 9822485311 )
यावल तालुक्यात शौचालयात खादाड सामुदायिक रित्या घेताआहेत टक्केवारीचा स्वाद… घेत असल्याने जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून कार्यवाही न केल्यास भ्र.वि.जन आंदोलन न्यास,जनसंसद समिती आणि आरपीआय आंदोलन करणार आहेत.
ग्रामीण भागात स्वच्छता अभियान यशस्वी होण्याकरिता शासनातर्फे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे परंतु यावल तालुक्यात शौचालय बांधकाम करताना संबंधित ठेकेदाराकडून संबंधित यंत्रणा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ठेकेदारांकडून वाजवीपेक्षा जास्त टक्केवारी/लाच घेत असल्याने शौचालयाचे बांधकामे अत्यंत निकृष्ट प्रतीची आणि अपूर्ण अवस्थेत करून ती कामे पूर्ण दाखवून ठेकेदारांना बिले अदा करण्यात येत आहेत.यावल तालुक्यात शौचालयांची जी बांधकामे सुरू आहेत आणि झालेली आहेत ती बांधकामे मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे चांगल्या प्रतीच्या बांधकाम साहित्यातच करण्यात आलेली आहे किंवा नाही याची चौकशी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी,ग्राम विस्तार अधिकारी,यावल पंचायत समिती बांधकाम शाखा अभियंता यांच्यासह संबंधित ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य का करीत नाहीत? यांचे आणि ठेकेदाराचे काही हितसंबंध आहेत का?याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शौचालयाचे काम मंजूर करताना जिल्हा परिषदला एका युनिटसाठी12 हजार रुपये मोजावे लागतात त्यानंतर शाखा अभियंता पाच टक्के घेतल्यावरच बनावट दस्तऐवज तयार करून खोटे बिल तयार करतात यावल तालुक्यातील कठोरा,बोरखेडा बुद्रुक आणि खुर्द ईचखेडा,मालोद या गावातील सौचालयाची चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल ठेकेदार म्हणतात की प्रमा काढण्यासाठी 24 हजार रुपये लाच द्यावी लागते त्यात10 हजार रुपये गटविकास अधिकारी यांच्या व संबंधितांच्या नावावर कोण कोणा कडून वसूल करत करीत आहे याची चौकशी होणे आवश्यक असून शौचालयांची बांधकामे मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे चांगल्या प्रतीची व्हायला पाहिजेत तसेच14व्या वित्त आयोगाचा प्राप्त निधी ग्रामपंचायतचा20टक्के निधी खर्च करताना सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावल तालुक्यातील शौचालयाच्या कामासह इतर सर्व कामांची चौकशी करणेसाठी एक समिती नियुक्त करून झालेली कामे मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणेच झालेली आहेत किंवा नाही याची चौकशी करून दोषीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जन संसद समिती जळगाव जिल्हा अध्यक्ष,तथा आदरणीय अण्णा हजारे कृत भ्र.वि.जन आंदोलन न्यास आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोकभाई तायडे यांनी केली आहे.
________________________________________________________________________________________________________________________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण यावल तालुक्यातील बातमी 9822485311 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
सुरेश पाटील
यावल तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9822485311