यावल येथील डॉक्टर जाकिर हुसेन विद्यालयात अनधिकृत शिक्षक भरतीची तक्रार.

यावल -दि.19- ( सुरेश पाटील )

येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू ज्युनियर कॉलेज यावल मध्ये शिक्षक भरती संदर्भात मुलाखती करण्यात आल्या असून त्या अनधिकृतरित्या भरली जात असून ती रद्द करण्यात यावी अशी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व राज्य शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार येथील आबीद खान युनूस खान यांनी केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
यावल येथील डॉ . झाकीर हुसेन उर्दू ज्युनियर कॉलेज यावल मध्ये जी शिक्षक भरती करण्यात आली त्या शिक्षक भरतीची जाहिरात एका वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली होती त्यात संस्थेचे चालक यांनी आपल्या नातेवाईकांसाठी ही शिक्षक भरती काढलेली आहे का? कारण शिक्षक भरती मध्ये आलेले उमेदवार पात्र व फार हुशार,मेहनती शेतकरी अपंग व गोरगरीब लोकांची मुले,मुली मुलाखतीसाठी आलेले होते पण संस्थाचालकांनी एकमेकांशी संगनमत करून आपले जवळचे नातेवाईक मुलामुलींना प्रश्नपत्रिकांची छायांकित प्रत देऊन त्यांना मुलाखत साठी बोलावण्यात आले होते त्यांनी सर्व प्रश्नांचे उत्तर पण दाखविले आहे असा आरोप आबीद खान युनूस खान यांनी केला आहे.
मुलाखतीस आलेल्या एका उमेदवाराने टीईटीचे प्रमाणपत्र हे खोटे व बनावट सादर केले आहे नव्हे तर प्रयोग शाळा सहाय्यक या पदासाठी मुलाखती साठी परराज्यातून बनावटी खोटे बोगस कागदपत्र तयार करून या उमेदवाराने फाईल जोडली आहे संस्था चालक व संचालक याचे नातेवाईकांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचे चर्चा सुरू असून गरजू व हुशार उमेदवारांवर अन्याय होणार नाही यासाठी वरिष्ठ स्तरावर या बोगस भरती व शासनाचे अटी व शर्ती चे पायमल्ली करून भरतीसाठी मुलाखत घेण्यात आली होती ही प्रक्रिया रद्द करून संस्थेच्या मनमानी कारभार बंद करण्यात यावा असे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे यासंदर्भात प्राचार्य गुलाम गौस खान नवाज खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संस्थेने रीतसर वृत्तपत्राला जाहिरात दिली होती आणि आहे त्यानुसार उमेदवार मुलाखतीला हजर होते व तोंडी परीक्षा देण्यात आली होती शेवटी निर्णय संस्थाचालक घेतील तसे आबिद खान यांनी केलेल्या आरोपांची चौकशी साठी पाठपुरावा केला जाईल असे समजले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!