सौखेडासिम येथे जि.प.शाळेत, ग्रामपंचायतीत सेवानिवृत्त सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची मागणी.

सावखेडा सिम ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत महिला सदस्य यांचे पती विकास पाटील व ग्रामपंचायत शिपाई हे निवेदन स्वीकारताना छायाचित्रात दिसून येत आहेत.

महिला सरपंचपतीने स्विकारले निवेदन. बिडिओ चे दुर्लक्ष.

यावल – दि.14 -( सुरेश पाटील )

तालुक्यातील सावखेडासिम येथे जि.प.शाळेत आणि ग्रामपंचायतीत होणारे ध्वजारोहण हे सेवानिवृत्त सैनिक,सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी,अधिकारी किंवा इतर तत्सम सेवानिवृत्त अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली या मागणीचे निवेदन स्वीकारताना ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच ऐवजी त्यांचे पती आणि ग्रामपंचायत शिपाई यांनी निवेदन स्वीकारल्यामुळे यावल तालुक्यात महिला पदाधिकारी यांच्या कामकाजात त्यांचे पतीदेव मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत असल्याचा स्पष्ट पुरावा समोर आला आहे यामुळे पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून तालुक्यातील महिला पदाधिकारी यांच्या पतीदेवांना कायदेशीर रित्या समज द्यावी असे सुद्धा तालुक्यात बोलले जात आहे.
सौखेडासिम ग्रामपंचायतीत व जि.प.मराठी शाळेत सेवानिवृत्त सैनिक किवा पोलीस किवा तस्सम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे असे निवेदन देण्यासाठी गावातील ग्रामस्थ शुक्रवार दि.13रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता तिथे महिला सरपंच स्वतः हजर नव्हत्या त्यामुळे तेथे उपस्थित असलेले त्यांचे पती विकास पाटील व शिपाई यांनी स्वतः ग्रामस्थांकडून निवेदन स्वीकारले व तसे फोटोसेशन सुद्धा करून घेतले त्यामुळे यावल तालुक्यात यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दुर्लक्ष पणामुळे महिला लोकप्रतिनिधी यांचा हक्क डावलून त्यांचे पतीदेव प्रत्यक्ष शासकीय कामात हस्तक्षेप करीत असल्याचा स्पष्ट पुरावा समोर आलेला आहे.अशाच प्रकारे मागणीचे निवेदन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांना सुद्धा देण्यात आले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे शाळा व ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण पदाधिकारी यांनी न करता सेवानिवृत्त फौजी किवा पोलीस किवा तस्सम अधिकारी यांनी केल्यास आपल्या गावाचे नाव पुर्ण पंचक्रोशीत अभिमानाने व कौतुकाने घेतले जाईल तरी आपण सदर निवेदनाचा गांभिर्याने विचार करावा हि विनंती या निवेदनावर मुस्तूफा रमजान तडवी,दगेखाँ निजाम तडवी,हुसेन रुबाब तडवी,बिस्मील्ला हुसेन तडवी,सिराज याकूब तडवी, न्याजोद्दिन सत्तार तडवी,तनविर दगेखाँ तडवी,अलताब महेमूद तडवी,आमिन अय्यूब तडवी, आसिफ राजु तडवी,आरिफ छब्बीर तडवी,मुनाफ खलिल तडवी यांच्या सह गावातील अनेक तरुणांसह ग्रामस्थांच्या साक्षरी आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!