कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या.. यावल तालुका कोतवाल संघटनेची मागणी मागणी.
यावल –दि.10–( सुरेश पाटील )
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा तसेच भेदभाव दूर करून समान काम समान वेतन प्रमाणे सरसकट पंधरा हजार रुपये वेतन द्या त्याचप्रमाणे तलाठी महसूल सहाय्यक व तत्सम पदासाठी 50 टक्के आरक्षण देण्यात यावे शिपाई पदाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल मधूनच भरण्यात यावा मयत झालेल्या कोतवालांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत समावून घ्यावे सेवानिवृत्त झाल्यानंतर कोतवालास दहा लाख रुपये रक्कम निर्वाहभत्ता व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन यावल तालुका कोतवाल संघटनेतर्फे यावल तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आले.
तसेच महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मुंबई मंत्रालय येथे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की15ऑगस्ट2021पर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास राज्यभरात कोतवाल संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल तरी शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा असे मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनावर कोतवाल संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष धनराज महाजन,उपाध्यक्ष प्रशांत सरोदे, सचिव सुमन आंबेकर,सदस्य ओंकार सपकाळे,तुषार जाधव, पंढरी अडकमोल,आयुब तडवी, निलेश गायकवाड आदींनी स्वाक्षरी केली आहे.