कुपोषणग्रस्त बाळाचा दुर्दैवी मृत्यू
शासनाने अद्याप गांभीर्याने दखल घेतली नाही! डॉ.कुंदन फेगडे.
यावल -दि.9-( सुरेश पाटील )
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी आदीवासी वस्तीवरील मागील आठवडयात प्रशासनाच्या गलथान व भोंगळ कारभारामुळे शासकीय योजना या आदीवासी वस्ती प्रयन्त न पोहचल्याने कुपोषणामुळे एका आठ महीन्याच्या बाळाचा दुदैवी मृत्यु झाला,या संदर्भात शासनाने अद्याप ही गांभींयाने दखल घेतली नसल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे पदधिकारी तथा नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी आसराबारी येथे भेटी दरम्यान दिली.
यावल नगरपरिषदचे युवा नगरसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन कर्तव्याची जाणीव ठेवुन सायंकाळच्या सुमारास कुपोषण बालकाच्या मृत्युमुळे समोर आलेल्या आसराबारी या50 घरांची वस्ती असलेले गाव समोर आले व त्यांच्या विविध धक्कादायक दुर्लक्षित समस्या उघड झाल्या,याच पार्श्वभुमीवर डॉ.कुंदन फेगडे यांनी कुपोषणामुळे मरण पावलेल्या बालकाच्या कुटुंबातील त्याची आई व वडील यांची भेट देवुन त्यांचे सांत्वन व्यक्त करून कुटुंबातील ईतर बालकांची आरोग्य आणी पोषण आहार विषयी सर्वतोपरीने काळ्जी घेण्याच्या मार्गदर्शनपर सुचना दिल्यात,दरम्यान डॉ.कुंदन फेगडे यांनी लहान बालकांना खाऊ देखील वाटप केला.याप्रसंगी त्यांनी गावातील आदीवासी बांधवांशी बोलतांना सांगीतले की आपल्याशी शक्य होईल ते मदत आपणास करण्यात येईल असे आश्वासन देवुन कालच राज्याच्या महीला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर या आसराबारी या गावापासुन पाच सात किलो मिटर लांब असलेल्या एका कार्यक्रमास उपस्थित राहील्यात पण तालुक्यात कुपोषणामुळे मरण पावलेल्या गावाला त्यांना भेट देता आली नाही हा प्रकार निंदनीय असल्याचे डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले.दरम्यान यावल दोन दिवसापुर्वी जळगाव येथील एका सामाजीक संस्थेच्या माध्यमातुन आसराबारी गावात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात ही चार मुलं कुपोषणग्रस्त असल्याचे प्रथम उपचारातुन मुंबई येथील डॉ.राहुल पाटील यांनी सांगीतले असुन,यात सावन शेखर पावरा, कल्पना बापराणी,अरूण गुड्ड बारेला व शेविन अशा चार बालकांवर तात्काळ उपचार करणे अत्यंत गरजे असुन,याच दृष्टीकोनातुन डॉ.कुंदन फेगडे यांनी त्या चार बालकांचे मोफत प्रथमोपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी त्यांच्या सोबत रितेश बारी,भुषण फेगडे, मनोज बारीआदी कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते.