सूनबाईचा दणका, भाजप खासदार रामदास तडस यांच्या मुलाने केला वैदिक पद्धतीने विवाह
वर्धा,
भाजपचे खासदार रामदास खडस यांच्या मुलगा पंकज तडस यांचा अखेर पूजासोबत वैदिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला आहे. त्यांच्या लग्नाची नगर पालिकेत नोंदणी सुद्धा करण्यात आली आहे. पूजाने केलेल्या गंभीर आरोपानंतर नाट्यमय घडामोडींना वेग आला आणि अखेर आज पुन्हा त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
काही दिवसांपूर्वी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सून पुजाचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग-ेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (छउझ र्ठीरिश्रळ उहरज्ञरपज्ञरी) यांनी टिवट केला होता. यात पूजाने आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आज नाट्यमय घडामोडींना वेग आला.
पंकज तडस यांनी पूजासोबत वैदिक पद्धतीने विवाह केला. नगर पालिकेत जाऊन रितसर नोंदणी सुद्धा केली. विशेष म्हणजे, मुलगा पंकज तडस आणि पूजाचं लग्न झालं आहे. पण, तिने तडस कुटुंबीयांवर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
लग्न झाल्यानंतर आता पूजानं आपली कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलं आहे.
तर पंकज तडस म्हणाले की, ’6 ऑॅक्टोबर रोजी माझं लग्न झालं होतं. त्यावेळी सुद्धा नोटरी केली होती. पण, वडिलांनी मला संपत्तीतून बेदखल केलं होतं. त्यामुळे संसार थाटण्यासाठी अडचणी येत होत्या. माझे वडील खासदार असल्यामुळे सुपारी घेऊन आरोप केले गेले. पण, मी कालही लग्नासाठी ठाम होतो आणि आजही आहे.’
तसंच, धनंजय मुंडे यांचं प्रकरण असेल किंवा 100 कोटी वसुलीचं प्रकरण असेल, अशी प्रकरणं दाबण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपचे खासदार असल्यामुळे आम्हाला टार्गेट केलं गेलं, असा आरोपही केला.
काय होता तो व्हिडीओ?
रुपाली चाकणकर यांनी आपल्या टिवटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पूजाचा हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असून माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहचले आहे
रुपाली चाकणकर यांनी पूजा यांचा अत्यंत गंभीर आरोप करणारा हा व्हिडीओ शेअर केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. अखेर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंकज तडस याने पूजासोबत पुन्हा एकदा वैदिक पद्धतीने विवाह केला आहे.