मोठे वाघोद्याच्या दृष्टी नसलेल्या तरुणाने.कविता लिहून काव्य दृष्टी हा काव्यसंग्रह केला प्रकाशित…
मोठे वाघोदा प्रतिनिधी.
कमलाकर माळी.✒️
घरात अठराविश्व दारीद्र.घरची परीस्थिती हलाखीची व डोळ्याने अंध पण या तरुणाने या सर्व गोष्टीवर वर मात करुन घरी कोणत्याही साहित्यिक वारसा नसुनही स्वतः च्या बुद्धीने कविता लिहून व त्याचा काव्यसंग्रह प्रकाशित करुन समाजासमोर एक नवीनच ओळख निर्माण केली आहे.
सविस्तर असे की रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील रहीवाशी महेंद्र सुकदेव वानखेडे याचे शिक्षण वाघोदा येथे झाले. नंतर पुढच्या शिक्षणासाठी महेंद्र याने जळगाव गाठले.घरची परीस्थिती गरीब असली तरी शिक्षणात तो हुशार होता.त्याचे शिक्षण आता BA झाले आहे. व त्याने खुर्ची विणणे.फाईल तयार करणे.लेथ मशीन आँपरेटर ट्रेनिंग.मोटार वाईडींग ट्रेनिंग असे कोर्स केलेले आहे.त्याला दृष्टी नसली तरी मनातल्या भावना आणी सभोवतालच्या कथारुपी व्यथांना काव्यात रुपांतरीत करण्याचा प्रयत्न महेंद्र या काव्यसंग्रहामार्फत करण्याचा प्रयत्न केला आहे. हे करतांना व दृष्टी नसतांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.तसेच परीवाराने ही त्याला या गोष्टीची जानीव होऊ दिली नाही.मग मनात येणाऱ्या विचारांची ते धरण दृष्टी धरण कविता लिहायला सुरुवात केली.त्याला मित्र परीवार नेहमी म्हणायचे की तुझ बोलण म्हणजे कविता आहे. हीच प्रेरणा मनी ठेवून महेंद्र याने कविता लिहायला सुरुवात केली.कविता लिहणे हा त्याचा छंद बनुन गेला.व काव्य दृष्टी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. हा काव्यसंग्रह सोप्या शैलीत मांडल्यामुळे कोणतेही वयोगटातील व्यक्ती तो वाचू शकतो त्यात जगणं अनुभवण्यासाठी डोळ्यांची नव्हे तर आत्मिक दृष्टीची गरज असते हे पण त्यांनी या कवितेतून दाखवून दिले आहे आपल्या अंगी असणारा कलागुणांना त्याने ही एक नवीन संधी दिली आहे व कुठलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना व दृष्टी नसताना महेंद्र याने प्रयत्नपूर्वक आपला कवितासंग्रह प्रकाशित करून अपंगत्व असलेल्या व्यक्तींना व्यास मिळवण्यासाठी त्यांनी एक ओळख निर्माण केली आहे या सर्व कार्यात त्याला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाचे सहकार्य मिळाले आहे याचे मार्गदर्शन त्याला श्री यजुर्वेद महाजन यांनी केले.तसेच दिपस्तंभ प्रकाशनाचे श्री जगदीश महाजन.ईमेज क्रिएशन चे अमोल महाजन यांचे विशेष सहकार्य मिळाले.