जळगाव.रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील वाघेश्वरी भवानी माता..

फोटो – कमलाकर माळी (मोठे.वाघोदा. ता रावेर )

मोठे.वाघोदा – प्रतिनिधी – ( कमलाकर माळी )

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील वाघेश्वरी भवानी मातेचे एक जागृत देवस्थान आहे सातपुड्याच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य असा वातानुकूलित परीसरात असलेले हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते हे रावेर पासून 13 किमी अंतरावर आहे.तर सावदा तसेच वेगवेगळ्या मार्गाने या मंदिरावर येण्यासाठी रस्ते आहेत. कुसुंबा गावापासून 2 किमी अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याला लागुन असलेल्या या मंदिरात आई भवानीची मूर्ती हि स्वयंभू असून भक्तांच्या नवसाला पावणारी आहे. मुख्य मूर्तीच्या गाभार्‍याच्या खालील बाजूस एक पाण्याचा झरा आहे.अनादी काळापासून आज ही तो भरलेला आहे.हे स्थान गुप्त गोदावरी म्हणून ही ओळखले जाते.सन 1958 मध्ये तोताराम सदा पवार यांनी मंदीराचा दुसऱ्यांदा जिर्णोद्धार केला.सन 1987 मध्ये भक्तांच्या मदतीने संतोष दासजी महाराज व एकनाथ दासजी महाराज सेवा करत होते.त्यांनी मंदीराचा सन 2002 साली मंदीराचा मोठा जिर्णोद्धार केला.आता विजयदासजी महाराज यांना मातेने सेवा करण्याची संधी दिली आहे.व ते या बरोबर गोसेवा पालन करून गोशाळा साठी प्रयत्न करत आहे. आईने अनेक भक्तांना दृष्टांत दिले आहेत या परिसरातील भाविकांचे अशी श्रद्धा आहे येथील झिराचे पाणी तीर्थ गंगेचे असून या तीर्थ पाण्याने स्नान केल्यास किंवा प्राशन केल्यास सर्व व्याधींचा नाश होतो व अध्यात्मिक वृद्धि होते श्री वाघेश्वरी भवानीमातेचे परमभक्त श्री एकनाथ दास जी महाराज यांनी 24 वर्षे अग्नी तपश्चर्या करून मुख्य मूर्तीच्या वरील बाजूस गुप्त गोदावरी शोधून काढली आहे व या तीर्थाच्या पाण्याने मंदिर परिसर हिरवागार झाला असून मंदिरातील पाण्याचा प्रश्नही मिटला आहे या वाघेश्वरी भवानीमातेची दरवर्षी पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा या दिवशी मोठी यात्रा भरते येथे संपूर्ण परिसरातील राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात तसेच यात्रा काळात नवस पूर्ण करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते .तसेच मातेची ओटी ही भरली जाते.येथील भैरंबुवा राक्षसाचे एक कथा ही आहे बैंरबुवा नावाचा एक राक्षस होता त्याने देवीस तू माझ्यासोबत लग्न कर अशी देवीला गळ घातली देवीने नकार दिल्यावर त्याने देवीच्या भक्तांना त्रास द्यायला सुरुवात केली भक्तांच्या संरक्षणासाठी देवीने त्या राक्षसाला होकार दिला व अट घातली की उद्याचा सुर्योदय होण्याच्या आधी तू माझ्याशी विवाह कर राक्षस आनंदात आपल्या नगरात गेला व संपूर्ण वराती सह तो.निघाला रात्री तो मंदिरापासून काही अंतरावर येऊन पोहोचला व विचार करू लागला सूर्योदय होण्यास अजून खूप उशीर आहे म्हणून थोडी विश्रांती घेऊया खूप वेळ प्रवास झाल्याने त्यांना झोप लागली मग सुर्योदय झाला तर संपूर्ण वरात व तो राक्षस यांची (शीळा)दगड झाले आजही मंदिरापासून सुमारे दोन किमी अंतरावर नगरकाठी या गावी ते शिळा दगड पाहावयास मिळतात येथे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त नवस मानतात व तेथे सध्या मंदिराचे पुजारी विजयदाजी महाराज हे काम पाहत आहे.आपणही परीवारासोबत दर्शनाचा लाभ घ्यावा.जय माता दी..

कमलाकर माळी.
मोठे.वाघोदा. ता रावेर.
मो.नं – 9637392628

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!