वरणगाव शहरात मानवी वस्तीत सुंदरशा हरणाचा शिरकाव..
वरणगाव- भुसावळ
हरीण म्हटले म्हणजे डोळ्यादेखत त्याचे सुंदर्तेचे दृश्य निर्माण होते हा प्राणी मनमोहक सा त्याचे रूप आखीवरेखीव बांधेसूद डोळ्यात बघितल्यावर शांत असा निरागसपणा सोनेरी रंगाचा आणि अंगावर पांढरे ठिपके असलेला नाजूक पण चपळाईने असलेला हरीण आताशी ऐंशी किलोमीटर प्रतितास धावतो हरिणाची जैविक साखळी मध्ये फार महत्त्वाचा दुवा आहे हरिणाच्या शरीरावरील रंग हे पावसाळ्यात अधिक गडद होतात तर उन्हाळ्यात हे फिकेही पडतात याची वय मर्यादा साधारण १५ वर्षे इतकीच असते
चितळ या नावाने ओळखले जाणारे मादी रूपी हरिणी वय वर्ष साधारण तीन वर्षे हे आपल्या सखेसोबती कळपातून भरकटून वरणगाव शहरातील भवानीनगर परिसरात मानवी वस्तीत सैरभैर झालेले होते मनमोहक रुपे सुंदर हरिणीला बघण्यासाठी बालगोपाळांचा मोठा जमाव जमून मनोरंजनाचा विषय ही होऊन आनंदही झालेला होता
या ठिकाणी उपस्थित राजेंद्र चौधरी दिपक मराठे यांनी वनपाल ललित गवळी व त्यांचे सहकारी वानखेडे यांना संपर्क करून माहिती दिली असता क्षणातच वनरक्षक हजर होत डॉक्टरांकडून हरणीची योग्य ती तपासणी करुन मालवाहू वाहनातून फॅक्टरी जंगल शिवारात सोडण्यात आले समस्त कार्यकर्त्यांनी मुक्या प्राण्यांची काळजी घेऊन हरिणीला योग्य त्या स्थळी सोडून माणुसकीचे दर्शन घडवले आहे
उपस्थित कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य गौरव लोखंडे चेतन माळी मुकेश मराठे दत्तात्रय माडी नितीन मराठे जालिंदर मराठे गाडी मालक गिरीश लोखंडे यांनी सहकार्य केले.