बी एच आर पतसंस्थे प्रमाणे- वरणगाव येथील सहकार मित्र चंद्रकांत बढे पतसंस्थाची गुन्हे अन्वेषण विभागा कडून चौकशी करून कार्यवाही व्हावी…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

बी .एच .आर .पतसंस्थेवर झालेल्या कारवाईचे जिल्हाभरात स्वागत . मात्र इतर पतसंस्थांचे काय ? कारवाईत सातत्य राहिल कां इतर पतसंस्थांप्रमाणे याचा सुद्धा व्हिडीओ बंद पडेल सुज्ञांना पडलाय प्रश्न.

वरणगांव :  जवळ जवळ काही वर्षांपूर्वी प्रत्येक जिल्ह्यासह महाराष्ट्र भर पतसंस्थाचे पीक आले. सहकार क्षेत्राचा मोठा उदय झाला . त्यातुन लाखो बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक पातळीनुसार रोजगार मिळाला . सहज कर्ज मिळू लागल्या मुळे व्यापारामध्ये पतसंस्थांचा पैसा चलन म्हणून खेळू लागला होता .परंतु सहकाराला स्वाहा ; काराचा संसर्ग झाला. त्यामुळे बहुसंख्य प्रमाणात पतसंस्था डबघाईस लागल्या. आणि होत्याचे नव्हते झाले. कर्जदार आणि संचालक तुपाशी आणि ठेवीदार उपाशी झाले. यातुन कित्येकांचे पैसे बुडाले म्हणून आजारी पडले काहींना अटॅक आले . काहींनी पतसंस्थांवर खटले दाखल केले . त्याचा सुध्दा उपयोग झाला नाही . काही दवाखान्यात उपचाराअभावी मेले . बऱ्याच सेवानिवृत्तांची जीवनभराची कमाई पतसंस्थेत अडकून पडली .व आजतागायत सुध्दा बरेच नागरिक पतसंस्थांचे उंबरठे झिजवत असुन आजसुद्धा  स्वकष्टार्चित रक्कम मिळण्यासाठी चातकासारखी वाट  पहात असुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत . काहींनी तर जवळपास आशा सोडून दिल्या आहेत .परंतु बीएचार पतसंस्थेच्या घोटाळ्याबद्दल सरकारने कारवाई सुरु केल्यामुळे ठेविदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .व कुठेतरी आशेचा किरण मिणमिणायला लागलाय .               परंतु हि कारवाई केवळ या एकाच पतसंस्थेपुरती मर्यादित रहायला नको अवसायनात गेलेल्या आणि आपली दारे घट्ट बंद करून बसलेल्या  प्रत्येक पतसंस्थे विरुद्ध अशा प्रकारच्या ठोस कारवाईची अपेक्षा संपूर्ण जिल्हयासह  महाराष्ट्रातील तमाम ठेविदारांना आहे. 

बी एच आर पतसंस्थेत ठेवीदारांच्या पावत्या३०/ ते४०/ टक्के सारख्या अत्यंत दरात आणि ते ही निव्वळ ठेव रक्कम यास गृहीत न धरता ठेवीदारांचा गैरफायदा घेत व त्यांना पूर्ण व्याजासहित संपूर्ण रक्कम अदा केल्याचे कागदोपत्री दाखवून त्या पावत्या संचालक तथा त्यांचे आप्तस्वकीय यांनी संस्थेकडून उचल केलेल्या अनेक करोडो कर्ज खात्यात बेकायदेशीर मॅचिंग करून अशी कर्जे निरंक दाखविलेले आहे आणि कर्ज उचल केलेली फार मोठी रक्कम तसेच त्याही पेक्षा काही पटींनी कर्जफेड दाखवलेली रक्कम याबाबत आयकर खात्याकडे कोणतेही विवरण नाही अगदी हाच प्रकार सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्था जळगाव या राज्यस्तरीय पतसंस्थेत झालेला आहे तसेच नागरिक सहकारी पतसंस्था जळगाव या राज्य पतसंस्थेत ही झालेला आहे
परिणामी शासनाच्या काही कोटी रुपयांचा आयकर पोटीचा महसूल बुडालेला असून काही कर्जदारांच्या प्राईम लोकेशनच्या मालमत्ता वर नजर ठेवून त्याआधी मातीमोल भावात संस्थेचे संचालक तथा त्यांची नातेवाईकांच्या नावे खरेदी करण्यात आलेल्या आहेत
हा प्रकार प्रामुख्याने करोडो रुपये बढे पतसंस्थेने बोगस कर्ज फार मोठ्या प्रमाणावर दाखवून ती स्वतः हडप करून काढून घेतलेली आहे
तथाकथित कर्जदारांवर कारवाईचा बडगा उचलून त्या मातीमोल भावात लाटलेल्या आहे
सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ नुसार कर्जदार विरुद्ध कर्ज नसून मिळणे कामी निबंधकास दाखला प्राप्त करताना सहकार कायदा राजरोसपणे खुटीला टागुंन दोन्ही राज्य पतसंस्थांची बेकायदा पद्धत अवलंबलेली आहे
बढे पतसंस्थेने निबंधकास मॅनेज करून राजरोसपणे दडपशाही केलेली आहे असे बरेच तथाकथित कर्जदार आहे की त्यांच्या एकूण मालमत्ता त्यांच्या काही पटीने त्यांची नावे बोगस कर्ज दाखवून ते स्वतः हडप केलेले आहे बढे पतसंस्थेने निबंधकास मॅनेज करीत १०१ चे दाखले मिळवणे कामी जो बेलगाम प्रकार केलेला आहे त्याबाबत बरेच पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून
यासंदर्भात चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेची ही कसून चौकशी व्हावी
अशी तक्रार लेखी स्वरूपात भाग्यश्री नवटके
आयुक्त महाराष्ट्र राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांना करण्यात आली आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!