वरणगाव पोलिसांनी पुन्हा टाकली धाड ८० हजाराची गावठी दारू उध्वस्त – हातभट्टी वाल्यांचे दणाणले धाबे..
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.
भुसावळ तालुक्यातील हतनुर परीसर हा तापी पूर्णा नदीचा पट्टा म्हणून ओळखला जातो या धरणकिनारी हातभट्टी दारू बनवण्याचे जणुकाही छोट्या-मोठ्या कंपन्या सारखेच मेहनत करून हातभट्टी चे उत्पादन घेतले जाते व माल बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे नवसागर मोहाचे फळ गुळ खराब झालेले बॅटरी चे सेल म्हशीला पणवण्यासाठी लागणारे इंजेक्शन असे सर्व साहित्य मिळुन हात भट्टी ही तयार करून मागणीनुसार गावपरिसरा मध्ये पुरवली जाते
या गाळलेल्या दारूची किंमत ही १० रुपये ते २० रुपये मग भरुन दिला जातो निर्मिती करणार व विक्री करणारे यामाध्यमातून स्वंताची उत्तम अशी धनप्राप्ती करवुन घेतात
व पिणारे हे आपलं धनाने भरलेलं पाकिट हे अशा दारू व्यावसायिकांकडून नशेच पाणी विकत घेऊन जवळचे धन जमा करत असतात.
या हातभट्टी चालकांच एक वैशिष्ट्य म्हणजे पिणाऱ्या कडे धनाची चणचण असल्यास ही लोकं दारु ही उधार देण्यासाठी पण तत्परता दाखवतात
याबाबत काही जानकारांची प्रतिक्रिया घेतली असता
शासन नियम हे मजबूत केले पाहिजे कायद्याची अंमलबजावणी व्हावी
जसे सैनिक हे देशाच्या सिमेलगत रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सेवा बजावतात त्याच प्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारीची सेवा घेतली गेली पाहिजे तेव्हाच अशा विषयाला आळा बसेल व परीसरातील हातभट्टी दारु गाळणे हे कायमस्वरूपी बंद होईल
या भट्टी ची गोपनीय माहिती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी काही पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत हातभट्टी बनवण्याच्या उध्वस्त केल्या व या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजाराच्या रसायन नष्ट केले त्यामुळे परिसरातील हातभट्टी बनवणार यांचे धाबे दणाणले आहे
वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कुमार बोरसे ASI श्री नरसिंग चव्हाण पो, कॉ श्री अतुल बोदडे होम, गजानन चव्हाण, बापू सुतार मिस्त्री हजर होते