वरणगाव नगर परिषदेचे नियमबाह्य बांधकामाकडे दुर्लक्ष -वरणगाव नगर परिषदेकडे तक्रार करूनही तक्रारदाराला दाखवला जातोय ठेंगा..
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.
वरणगाव तालुका भुसावळ
नगर परिषद हद्दीतील बांधकाम करण्याच्या अगोदर घर मालकाला रीतसर परवानगी घेऊन अभियंताद्वारे नकाशा बनवला जातो
व आपल्या हद्दी मध्येच बांधकामे शासन नियमांच्या अटी व शर्तीवर केले जाते
तरी शासन नियम डावलून घर मालक बांधकाम धारक प्लॉट नंबर ६६ गट नं ६०७/१ मध्ये अनाधिकृत बांधकाम केलेले आहे
तक्रारदार यांनी विरुद्ध इसमाला इशारा दिला की आपण नियमबाह्य बांधकाम करीत आहात काही जागा ही रिकामी सोडावी परंतु त्यांनी आमच्या इशाऱ्याला व शासनाच्या नियमांना दाद न देता बांधकाम हे सुरू ठेवले
बांधलेल्या दोन रूम मुळे दुषीत वासामुळे दुर्गंधी पसरुन आमच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
या संदर्भात आम्ही वरणगाव नगर परिषदेमध्ये तक्रार देऊनही अद्याप पाहतो कुठलीही कार्यवाही ही झालेली नाही
कोरोना काळात वरणगाव शहरातील काही दुकाने ही नियमाचे उल्लंघन करून दुकाने ही सुरूच राहत होती त्या कारणाने वरणगाव नगरपरिषद चे अधिकारी व कर्मचारी आपला संपूर्ण ताफा सहित धाड मारल्यागत येत असत व दंडाची पावती हातात टिकवत पैसे घेतले जात असे
संबंधित तक्रारदाराने अनाधिकृत बांधकामाबाबत तक्रार करून सुद्धा विरुद्ध इसमावर नगरपालिकेची कार्यवाही करण्यास तत्परता न दाखवता विलंब का होत आहे
असे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे