वरणगाव पोलीसांनी तीन डंपरवर झडप घालून केला अटकाव…
वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय संदीप कुमार बोरसे वरणगाव तलाठी व सर्कल अधिकारी यांनी जाहीर केले आहे की शासन नियमांचे पालन करुनच वाहतूक करा अन्यथा आपल्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल.
वरणगाव तालुका भुसावळ धरणातील गाळ डंपर द्वारे वरणगाव शहरातून नेत असताना पोलिसांनी केली नोंद
सविस्तर माहिती वरणगाव शहराची ओळख ही तशी वीट कारखाना म्हणून प्रसिद्ध आहे यात बहुतांश धरणातील गाळचा वापर हा वीट बनवण्यासाठी केला जातो व काही प्रमाणात शेतामध्ये ही टाकण्यात येतो
प्रशासन हे वारंवार सूचना देत असते की डंपर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात माती राख व इतर मटेरियल भरू नये
डंपरमध्ये अतिरिक्त वजन भरून वाहन चालवून ड्रायव्हर हे स्वतः तर धोका पत्करून वाहन चालवतात पण यामुळे इतर नागरिकांचे ही जीव धोक्यात टाकले जातात
क्षमतेपेक्षा वजनामुळे वाहनेही पलटी होणे टायर फुटणे या कारणामुळे असे बरेचसे अपघात होऊन नागरिकांचे नाहक बळी जात आहे
अवैद्य रित्या परवाना कागदपत्र जवळ न ठेवता मिळून आले असता व वाहनांची कागदपत्र व परवाना हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहे
वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी एपीआय संदीप कुमार बोरसे वरणगाव तलाठी व सर्कल अधिकारी यांनी जाहीर केले आहे की शासन नियमांचे पालन करुनच वाहतूक करा अन्यथा आपल्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी.
वरणगाव पोलीस स्टेशन चे एपीआय संदीप कुमार बोरसे यांनी सदर प्रकरणाची नोंद घेतलेली आहे.