वरणगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने महावितरणच्या अधिकारींचे वाढले टेंशन…
वरणगाव शहर येथे महावितरणचे अधिकारी व कर्मचारीचें पथक निघाले वसुलीसाठी.
वरणगाव तालुका भुसावळ दि ०२ तारखेला बारा वाजेच्या दरम्यान वरणगाव येथील थकबाकीदार ग्राहक यांच्या निवासस्थानी जाऊन वसुली सुरू केली आहे
दैनंदिन जीवनामध्ये विजवापर ला फार मोठे महत्व असून
त्या शिवाय मनुष्य कुठलेही काम करू शकत नाही मग तो मोबाईल असो लाईट टीव्ही थंड हवेचे कुलर कम्प्युटर किंवा घरातील विजेच्या माध्यमातून चालणारी इतर उपकरण
घरामध्ये वीज जोडणी असल्याशिवाय कुठलेही काम होऊ शकत नाही वीज ही बहुतेक ठिकाणी कोळशापासून बनवली जाते
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
शासन व काही खाजगी कंपन्या हे विजवितरण करून मोठ्या कंपन्या फॅक्टरी रेल्वे व गाव शहरातील नागरिकांना वितरित करुन विजवापरकर्ते कडून महिन्याला बील घेतले जाते
व बील थकबाकी ग्राहकांना वेळ देऊन नंतर वसूली केली जाते.
विज बनवण्यासाठी शासनाला इतर मटेरियल साहित्य कोळसा वाहतूक मनुष्यबळ यांचा पगार वजाबाकी करुन वीजवितरण कंपन्या चालवल्या जातात
जर विजवापरकर्ते कडून थकबाकी होत असेल तर मग विजवितरण कंपन्या यांना लागणारा खर्च चालवणार कसा
यासंदर्भात वरणगाव कक्ष सहाय्यक अभियंता दत्तात्रय पाटील यांना थकबाकी वसुलीचे जिम्मेदारी चे महत्वाचे काम असल्यामुळे सदर होऊन वरणगाव येथे नगरपरिषद येथील कर्मचारी यांच्या निवासस्थानी थकबाकी वसुलीसाठी आलो असता सलग तीन महिने झाले व वारंवार सूचना देऊन आपली राहिलेली थकबाकी पाच हजार रुपये भरण्याचे आम्ही सूचना दिलेल्या होत्या परंतु त्यांनी फक्त दोन हजार रुपये भरले होते व तेही टप्प्यामध्ये
व राहिलेली थकबाकी घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार
ग्राहक यांच्या निवासस्थानी आलो असता याठिकाणी कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील यांनी सांगितले की वरणगाव येथील एक थकबाकीदार ग्राहक यांनी अजून आम्हाला दोन ते चार दिवसांची वेळ देण्यात यावी ती आम्ही त्यांना दिलेली असुन
पण ठरल्या वेळेप्रमाणे थकबाकी न मिळाल्यास आम्हाला नाईलाजास्तव विजजोडणी तोडावी लागेल हे आम्ही दैनिक महाराष्ट्र सारथी च्या माध्यमातून एका थकबाकीदार ग्राहकास सुचित करत आहोत याची त्यांनी नोंद घ्यावी.
याबाबत थकबाकी मिटर मालक यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की मी एक नगरपरिषद चा कर्मचारी असून नगरपरिषद चे आमचे पगारही वेळेवर होत नसल्या कारणाने विज वापर ची थकबाकी झालेली आहे
आमचे पगार जर वेळेवर झाले तर थकबाकी ही राहणारच नाही
कुणाकडून उधार मागितले असता तर रक्कम मिळत नाही माझी राहिलेली थकबाकी ही मी चार दिवसात भरणार आहे असे त्यांनी सांगितले
या वसुली पथकात
सहाय्यक अभियंता डीआय पाटील
कनिष्ठ अभियंता शशिकांत भट्ट
सीनियर टेक्निशियन दुर्गेश फेगडे अमिन शहा गजानन झांबरे
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
वरणगाव येथील बदली झालेले मुख्याधिकारी श्याम कुमार गोसावी यांनी वरणगाव शहरातील घरपट्टी पाणीपट्टी वापरकर्त्यांना थकबाकी असलेली रक्कम लवकरात लवकर नगरपरिषद मध्ये जमा करून
आम्हाला सहयोग करावा जेणेकरून जमा झालेली थकबाकी रकमेमध्ये योग्य ते नियोजन लावून पालिकेतील कर्मचाऱ्यांचे थकित पगार देता येतील व उरलेल्या पैशांमधून वरणगाव शहरातील नागरिकांना दैनंदिन योग्य त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सूचित केलेले होतेे
मुळातच हा विषय गंभीर असून यात नेमकी चूक कोणाची
वीजवितरण वसुली पथकाची
का वीज वापर थकबाकी ग्राहकाची
का वरणगाव नगरपरिषदेची
का घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी ग्राहकांची
हा तर एक चिंतन करण्याजोगे ज विषय आहे
असं वरणगावातील सुज्ञ नागरिकांमधून बोललं जात आहे.