मंडळ अधिकारी तलाठी व बोदवड दुय्यम निबंधक यांची चौकशी होणार.!
जिल्हाधिकारी यांचे आदेश..
भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी – ( प्रशांत पाटील mob.- 9594047437 )
(वरणगाव ) –
भ्रष्टाचार हा शब्द कानावर पडताच अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात
भ्रष्टाचार म्हणजे सरकारी पगारप्राप्त करत इतर गरजा भागवण्यासाठी घेतली जाणारी रक्कम म्हणजे सरकारी यंत्रणेला अंधारात ठेवत कार्यालयाशी बेईमानी करत आपले घरातील तिजोरी भरून स्वतःवर व आपल्या परिवाराचे अतिरिक्त असलेल्या इच्छा-आकांक्षा व महागड्या वस्तू खरेदी करून बघितलेले स्वप्न पूर्ण करणे म्हणजे लाच स्वीकारणे हा एक सोयीस्कर असा मार्ग सरकारी यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने स्वीकारत मिळणाऱ्या लाचेच्या रकमेची आवर्जून लक्षपूर्वक जंगलातील एखाद्या शिकारी प्रमाणे निशाना लावत जाळे बिछवत वाट ही बघितली जाते
पण केव्हा तरी ही लाच मागणारी मंडळीच त्यांच्याच टाकलेल्या जाळ्यात सुज्ञ लोक लाचलुचपत विभागाला तक्रार करून लाचलुचपत विभाग यंत्रणाच त्यांना अटकवून टाकते
वरणगाव शहरातील तक्रारदार श्री किरण लक्ष्मण कोलते यांच्या शेत शिवारातील वडिलोपार्जित शेत मिळकत मौजे वरणगाव येथील गट क्रमांक १७२ क्षेत्र पूर्वेस गट क्रमांक १६९ .१७१ पश्चिमेस वरणगाव तपत कठोरा रोड वर असून उताऱ्या नुसार एकूण पाच हिस्से असून संबंधित नातेवाईकांनीच खरेदीदार श्री रमेश बाबुराव चौधरी यांना साथ लक्ष ऐंशी हजारात विक्री करण्यात आली असून
वरणगाव येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आर्थिक देवाण-घेवाण केलेली आहे व तसेच यात बोदवड येथील दुय्यम निबंधक यांनीही कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी न घेता तो नोंदविण्यात आलेला असुन वाहत्या गंगेत हात धुतलेले आहेत
काही सरकारी यंत्रणेतील लोकं कागदपत्रांचे फेरफार करून आपल्या शातीर बुद्धिमत्तेचे कौशल्य दाखवत पैसा गोळा करण्यास माहीर असतात
तक्रारदार यांनी मंत्रालयापर्यंत अर्ज केले असता जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत चौकशीचे आदेश निघालेले असुन
जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये खडबळ उडाली आहे