डॉक्टर वसीम शेख ठरले जिल्ह्याचे आदर्श व्यक्तिमत्व
मुस्लिम समाज बांधवांची लसीकरणात उत्तम प्रतिसाद…
वरणगाव (प्रतिनिधी)-
कोरोणा संसर्ग आजाराने जगभरात खूप प्रमाणात थैमान हे घातले असता जगातले शास्त्रज्ञ व अन्य डॉक्टर सुद्धा हतबल झाले होते अनेको प्रयत्न करून सुद्धा या कोरोना सारख्या संसर्ग आजारावर अटकाव करण्यास अपयश हे येत होते देशातले शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस एक करत अथक प्रयत्नानंतर इतर देशातील व भारत देशातील शास्त्रज्ञांना यश प्राप्तीचा मार्ग दिसू लागला असता व कालांतराने लस चाचणी करून अंतिम मान्यताही देण्यात आली असता संपूर्ण देशाने भयंकर अशा कोरोना माहामारी संसर्ग आजारावर विजय प्राप्त झाल्याचा आनंद हा झाला होता.
कोरोणा महामारी मध्ये भारतातील अनेक डॉक्टरांचा रुग्णांना आपली सेवा देत असताना डॉक्टरांचे बळी हे गेले आहेत.
वरणगाव शहरातील डॉक्टर वसीम शेख रुग्णांना सेवा देत असतानाच कोरोनाची लागण झाली असता कोरोनावर मात करत आपली अखंड सेवा देण्यास पुन्हा हजर झाले होते.
भारतामध्ये कोव्हॅक्सिंन व कोविडशिल्ड दोन प्रकारच्या लस काही दिवसाचे अंतराने नागरिकांचे लसीकरण हे करण्यात आले भारतामध्ये सरकारी दवाखान्यात या दोन प्रकारच्या लस पूर्णपणे निशुल्क मध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. वरणगाव शहरांमधील ग्रामीण रुग्णालय कठोरा रुग्णालय व पिंपळगाव रुग्णालय वेळोवेळी लसीकरण हे केले जात असून त्याचप्रमाणे शहरातील माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक व तळागळातील सामाजिक कार्यकर्तेंनी आप आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मी सुरक्षित गाव सुरक्षिततेची जबाबदारी घेत ठिकठिकाणी शिबिरे लावले जात होते.
वरणगाव शहरातील मुस्लिम समाज बांधवांमध्ये लस घेणे या विषयी काही मनामध्ये भीती ही पसरली असता मुस्लिम बांधवांन कडून लस घेण्यासाठी दुर्लक्ष केले जात होते या विषयाची डॉक्टर वसीम शेख यांनी आपल्या परिसरात आसपासच्या रहिवाशी नागरिकांना याबाबत सखोल अभ्यासु मार्गदर्शन करत नागरिकांच्या मनात लपलेली भीती पळवत लस घेण्यासाठी प्रोत्साहनपर योग्य ते मार्गदर्शन केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे व वरणगाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षितिजा हेडवे व इतर स्टाफ यांच्या मोलाच्या सहकार्याने सर्वप्रथम अक्सा क्लीनिक येथे शिबिरे भरवण्यात आले व या लावलेल्या शिबिरात नागरिकांनी सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र हे निर्माण झाल्याने डॉक्टर वसीम शेख यांचा आनंद गगनात मावेनासा झाला याबाबत त्यांनी आपल्या समाजातील राजकीय पदाधिकारी मुस्लिम चारिटेबल ट्रस्ट शी संवाद साधत इतर वेगवेगळ्या परिसरात लसीकरण शिबिरे लावण्याची विनंती केली असता व भा.ज पा माजी नगराध्यक्ष अखलाक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अश्फाक काजी राष्ट्रवादी युवा शहराध्यक्ष साहिल कुरेशी व इतर पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी योग्य ती मेहनत घेऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करत जवळजवळ ऐंशी टक्के लसीकरण करण्यात यश मिळवले आहे यापुढेही डॉक्टर वसीम शेख व इतर राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पूर्ण शंभर टक्के लसीकरण करण्याचे ध्येय ठरवले असून योग्य ती मेहनत घेतली जात आहे लसीकरणाचा वसा घेतलेल्या डॉक्टर वसीम शेख व त्यांचे इतर सहकारी डॉक्टर्स यांच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत असून शासनातर्फे त्यांना कोरोणा योध्दा बक्षिस जाहीर करण्यात यावे अशी वरणगाव शहरातील मागणी हि होत आहे.