वरणगाव शहराला तालुका करण्यात यावा विभागीय आयुक्त श्री गमे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी

वरणगाव (प्रतिनिधी)-

वरणगाव हे इंग्रज काळात पासुनच तालुका दर्ज्याचे गाव म्हणून ओळखले जायचे वरणगाव ला पूर्वी ७२ खेडे लागू होते पूर्वी जर वरणगाव तालुका होते तर आता वरणगाव तालुका निर्मिती करा अशी मागणी आज विभागीय आयुक्त श्री गमे यांची आज जळगाव येथे भेट घेऊन केली यावेळी विभागीय आयुक्तांना भौगोलिक प्रस्तिथी चा विचार करता वरणगाव ला साध्य ३२ खेडे लागू आहेत हतनूर धरण ,दिपनगर येथे विजनिर्मित्ती केंद्र आहे तसेच वरणगावच्या लागून आयुध निर्माणी केंद्र आहे आहे रेल्वे स्टेशन ग्रामीण रुग्णालय तसेच वरणगाव हे नगरपरिषद असलेले शहर आहे तसेच शासकीय कामासाठी २० किलोमीटर भुसावळ ला जावे लागते जेष्ठ नगरिकांना भुसावळ ला जाणे येणे शक्य नाही परत वरणगाव परिसराची लोकसंख्या २ लाखा च्या वर आहे तालुका निर्मिती साठी वरणगाव हे बसते अश्या प्रकारची महत्वपूर्ण माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विभागीय आयुक्त श्री गमे व जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांना सांगितली यावेळी भाजपाचे श्री रमेश पालवे किरण धुंदे जिल्हाउपाअध्यक्ष मिलिंद भैसे गोलू बोदडे सागर वंजारी उपस्तीत होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!