वीस दुचाकी वाहनांचा वरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने लिलाव

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

वरणगाव -भुसावळ येथील पोलीस स्टेशनच्या वतीने आज बेवारस स्थितीत असलेल्या विस दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात आला हा लिलाव 30हजार रुपये मध्ये झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी दिली

2011 पासून वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये सुमारे वीस दुचाकी वाहने बेवावरस अवस्थेत पडून होती ,या वाहनांचा आज कायदेशीर रित्या लिलाव करण्यात आला, या लिलावामध्ये जवळपास 18 लिलाव धारकांनी सहभाग घेतला होता, या वीस वाहनांची शासकीय किंमत 27 हजार ठेवण्यात आली होती, तर ही 20 दुचाकी वाहने तीस हजार रुपयाला लिलावामध्ये विक्री करण्यात आली, असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!