आदिवासी विकास विभागाचे आदिवासींवरच दुर्लक्ष ..!
ठाणापाडा माकपच्या आंदोलनात आंदोलनकर्ते संतप्त ; रात्री ९ वाजता आंदोलन संपुष्टात.
हरसूल (प्रतिनिधी)-
त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेने ठाणापाडा येथे माकपचे सचिव इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.यावेळी विविध मागण्या मान्य होत नाही तो पर्यन्त आंदोनल सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने अखेर गुरुवारी (दि.२८)रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सुरू झालेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी दि.२९) रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन आंदोनलकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलन संपुष्टात आले.यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी आदिवासी विकास विभागाचेच आदिवासींवर दुर्लक्ष असल्याने केवळ या विभागाच्या हलगर्जीपणामुळे दोन दिवस मागण्यासाठी आंदोलन करावे लागले असा संतप्त सूड उमटवीत चांगलेच धारेवर धरत प्रश्नाचा भडिमार केला.
ठाणापाडा (ता.त्र्यंबकेश्वर) येथे विविध मागण्यांसाठी माकपच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.गुरुवारी सुरू झालेले आंदोलन शुक्रवारी रात्री ९ वाजता संपुष्टात आले.यात पाणी पुरवठा विभाग,महसूल विभाग,लघु पाटबंधारे, जलसंधारण,शिक्षण विभागासह आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी जो पर्यंत येत नाही,समस्या जाणून घेत नाही,तसेच त्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने सलग दोन दिवस आंदोलन सुरूच होते.त्यात खावटी,शिक्षण, रोजगार हमी,घरकुल ड यादी,घरकुल हप्ते,रेशन कार्ड,गाव तेथे स्मशानभूमी,मनरेगा,भूमिहीन आदींचा समावेश आहे.आदिवासी विभागाने शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रम प्रमाणे खावटी योजनेचे प्रकरण,शिक्षण विभागातील चाललेला गलथान कारभार,शिक्षकांवर न राहिलेला वचक आदी बाबींच्या पुरतेतेसाठी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिल्याने शुक्रवारी ( दि.२९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डी. आर.गुजर यांनी आंदोलनस्थळी धाव घेत आश्वासित केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी आदिवासी विभागच आदिवासींना वाऱ्यावर सोडत असून केवळ दोन दिवस अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी के.एस. भोये,एम. भी.भांगरे,जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ,माजी सभापती ज्योती राऊत,उपसभापती देवराम मौळे,तुळशीराम राऊत,लक्ष्मण गवते,काळूदास वड,पुंडलिक गोतरणे,जयवंत राऊत,पंडित गावीत,दिलीप भोये,नामदेव भुसारे,यादव पवार,मझर शेख आदींसह विविध विभागाचे अधिकारी,आंदोलनकर्ते उपस्थित होते.हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.