स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शालेय परिसरात स्वछता मोहीम

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी):

केंद्र सरकारने यंदाचे वर्ष ‘ आजादी का अमृतमहोत्सव’ साजरे करण्याचे ठरवले आहे. श्रीमान टि.जे. चौहाण ( बिटको) माध्यमिक विद्यालय मोरेवाडी नाशिक येथे स्वच्छता मोहिमेअंतर्गत शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रीय हरित सेना, ईको क्लबचे विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. मुख्याध्यापक साहेबराव अहिरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. घरी व परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणावी असे आवाहन मुख्याध्यापकांनी केले.

यावेळी शाळेचे पर्यवेक्षक कीर्तीकुमार गव्हाणकरी, संगीता कांगुणे, शोभा देवरे, रत्ना महाजन तनुजा शहाणे, संदीप देवरे, प्रदीप ठाकरे,शिवाजी मोरे, हरित सेना समन्वयक प्रदीपसिंग पाटील आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!