आई केअर टेकर संस्थेतर्फे हट्टीपाडा जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप…

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी):

आई केअर टेकर संस्था मुंबई’ या संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील टाकेदेवगाव केंद्रातील हट्टीपाडा जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांना वही,पेन, पेन्सिल, चित्रकला साहित्य अशा शालेय साहित्यासह कपडे वाटप करण्यात आले आहे. तसेच गिरणवाडी व आव्हाटे या शाळांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे.

शैक्षणिक साहित्य व कपडे मिळाल्याने विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली मदत मोलाची आहे.

याप्रसंगी आई केअर टेकर संस्थेचे वसंत मॅक, अलेक्स सर,नाना वारे( माजी सरपंच ) अनील रहाटे( शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ) हेमलता वाघ ( ग्रा.पं.सदस्या) भोराबाई वाघ ( आशा सेविका ) हट्टीपाडा जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा दाणी मॅडम, उपशिक्षिका कविता गांगुर्डे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!