दापुरे येथे सांस्कृतिक भवन कामाचे भूमिपूजन…

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी):

त्र्यंबकेश्वर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष संपत सकाळे व इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे कार्यकुशल आमदार हिरामण खोसकर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी उपयोजनांतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बु.ग्रामपंचायतीत मंजुर झालेल्या सांस्कृतिक भवन इमारत रक्कम 50 लक्ष अंदाजपत्रकीय रकमेचे सांस्कृतिक भवन इमारतीचे भूमिपूजन दापुरे येथे इंजीनियर अजित सकाळे व भास्कर खोसकर यांच्या शुभहस्टे करण्यात आले.

सांकृतिक भवनमुळे आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी व सामाजिक कार्यक्रमांसाठीही या भवनाचा वापर करण्यात येणार आहे.

यावेळी झारवड बु.ग्रामपंचायतीचे सरपंच चंदर लोभी, उपसरपंच सोमनाथ बोराडे, ग्रा.वि.अधिकारी स्वप्नील पाटील, ग्रा.पं सदस्य शोभा शिद, कृष्णा ठवळे, विष्णू झुगरे, सिताबाई भुतांबरे, कल्पना गोंदके, द्वारका खाडे, मनोज बोराडे, पोपट शिद, संतोष शेंडे, सखाराम शेंडे,शिवा लोभी, बबन लोभी, देवराम हळकुंडे, कुंडलिक बोराडे, प्रशांत बोराडे, संदीप बोराडे, अमृता लोभी, बाळु नारळे, वसंत हंबीर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!