श्रीमान टी.जे. चौहाण ( बीटको ) माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा…
त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी):
श्रीमान . टी.जे. चौहाण ( बीटको ) माध्यमिक विद्यालय मोरवाडी ( नाशिक ) येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आला.
या विद्यालयात अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांचा परिचय व सारांश त्यांच्याच शब्दांत उपस्थितांना सांगितला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रकांचे वाटपही यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेतील ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करुन ज्ञानवंत व्हावे असे प्रतीपादन शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे यांनी केले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधुन कै. कल्पेश गव्हाणकरी यांच्या स्मरणार्थ शाळेचे पर्यवेक्षक कीर्तीकुमार
गव्हाणकरी, यांनी शाळेस पुस्तके भेट दिली.
कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबराव अहिरे, पर्यवेक्षक कीर्तीकुमार गव्हाणकरी , ग्रंथपाल सुरेखा शिरसाठ, सांस्कृतिक विभागाचे शिवाजी मोरे , हेमांगी खैरनार, अलका चंद्रात्रे, संगीता कांगुणे, शोभा देवरे, रत्ना महाजन , कलाशिक्षक महेंद्रकुमार झोले, स्वाती पाटील, गर्गे, प्रवीण ठाकरे, विनोद बैरागी, संदीप देवरे, नितीन कंक , यशवंत गावीत व विद्यार्थी उपस्थित होते.