त्र्यंबकेश्वरला रोजगार हमी योजनेसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन

न.पा.चे नागरिकांना जॉबकार्ड व रोजगार देण्याचे लेखी आश्वासन

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी:

धार्मिक व पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरात दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे व्यवहार चक्र कधी ठप्प, तर कधी मंदावले आहे. लॉकडाऊन , जनता कर्फ्यूमुळे पुरुष व महिलांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे ते बेरोजगार झाले आहेत.नागरिकांना जॉबकार्ड व रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व कार्यालयअधिक्षक पायल महाले यांनी लवकरच रोजगार जॉबकार्ड व रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिले.

राज्य शासनाने नगरपरिषदेला रोजगार हमी योजना लागू केली आहे. याबाबत चार महिन्यांपूर्वीच जी.आर.( आदेश ) आलेला आहे. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. 9 सप्टेंबर रोजी नगरपरिषदेला निवेदन देऊन बेरोजगार महिला व पुरुषांना जॉबकार्ड व रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु महिना उलटूनही त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. वंचितच्या आंदोलनाची दखल घेऊन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर , नगरसेवक सागर उजे, दिपक लोणारी , कार्यालयअधिक्षक पायल महाले यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा केली.

याप्रसंगी वंचितचे तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, शहराध्यक्ष मोहन सोनवणे, महिला आघाडीच्या संगीता भांगरे, मंगल गुंबाडे, कमल वाघ, शेवंता जाधव , पुष्पा झोले, शिला भांगरे, लता भांगरे, संगीता गमे, अनिता बदादे, मीना दिवे, संघटक अनिल गांगुर्डे , दिपक गांगुर्डे, सहचिटणीस अंकुश सोनवणे, युवक उपाध्यक्ष नितीन काशीद , उपाध्यक्ष बाबराव लहांगे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!