देवगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी -( पांडुरंग दोंदे )
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वावीहर्ष उपकेंद्रांतर्गत देवगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पार पडले.
लसीकरणात 113 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. आरोग्य सेविका इंदूमती गावीत यांनी लस टोचणीचे काम केले.डॉ. अरुणा पाटील, आरोग्य सेवक वसावे, आशा डोळस, योगीता वारे, नंदाबाई जाधव , भोराबाई लोहारे, यमुनाबाई मधे या सर्व आशा वर्कर्स यांनी सहकार्य केले.
यावेळी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व नागरिक उपस्थित होते.