कोजुली जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप

त्र्यंबकेश्वर! प्रतिनिधी :- ( पांडुरंग दोंदे )

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन नाशिक येथील ‘ एक्युमेनीकल ख्रिश्चन फेलोशिप ‘ या संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोजुली जि.प .शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.

या संस्थेतर्फे गेल्या चौदा वर्षांपासून अविरतपणे असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोजुली जि.प.शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना या संस्थेतर्फे वह्या, पेन, पाट्या,चित्रकला साहित्य,तसेच मास्क,सेनीटायजर,व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळा डिजीटल करण्यासाठी आजवर या संस्थेतर्फे कोजुली शाळेसाठी संगणक संच, ओहरहेड प्रोजेक्टर, वॉटर फिल्टर,आदी साहित्य कोरोना काळात दिले आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष फादर स्यामसन स्यामुअल, उपाध्यक्ष फादर पॉल मेथ्यू, स्याम्युअल कोशी, संस्थेचे विश्वस्थ टोनी सर , सचिव जॉन्सन डेव्हिड, संयोजक अब्राहिम सर , शाळेच्या मुख्याध्यापिका शैला खुळे,उपशिक्षक विशाल पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!