थोरगव्हाण विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी..
थोरगव्हाण प्रतिनिधी –
डी एस देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण तालुका रावेर येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आरोग्य सप्ताह सुरु आहे या सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली याप्रसंगी रावेर पथकातील आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील ,फार्मासिस्ट श्री जगदीश महाजन सहकारी श्री सुरेश पाटील आरोग्य अधिकारी डॉ श्री प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून किरकोळ आजारावर औषध उपचार केला. यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सत्यनारायण वैष्णव यांनी डॉक्टर प्रशांत पाटील व पथकातील सदस्यांचे स्वागत केले पर्यवेक्षक श्री डी के पाटील आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख श्री युवराज कुरकुरे यांचेसह सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर प्रशांत पाटील यांनी कोरोना कालखंडानंतर घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.