देशमुख विद्यालय थोरगव्हाण तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पूर्ववत सेवा सुरू..

थोरगव्हाण प्रतिनिधी –

डी. एस . देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण तालुका रावेर विद्यालयाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे असे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सत्यनारायण वैष्णव यांनी कळवले.दी एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण तालुका रावेर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत बस सेवेची संधी दरवर्षी प्रमाणे उपलब्ध करून दिली आहे .शैक्षणिक वर्ष 2021- 22 या शैक्षणिक वर्षासाठी दिवाळीनंतरच्या कालखंड ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे ही सेवा नियमित सुरू राहील असे आश्वासन रावेर तालुका माजी आमदार तथा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री आर आर पाटील साहेब यांनी सांगितले या सेवेची संधी तासखेळा,रणगाव, सुदगाव, मांगी ,चुनवाडे ,करंजी वाघोदा, गाते या पंचक्रोशीतील गावातील विद्यार्थी घेत आहेत. ह्या मोफत सेवेचे पालकांमधून स्वागत करण्यात आले. सतत तेरा वर्षापासून संस्थेने ही मोफत बससेवा अखंडितपणे सुरू ठेवली आहे याचे पालकांच्या वतीने पालक श्री राजेंद्र शिंदे थोरगव्हाण श्री योगेश नारखेडे गाते यांनी आभार व्यक्त केले .कोरोना नैसर्गिक आपत्ती नंतर शासकीय आदेशानुसार पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत विद्यार्थी पालक आनंदी झाले आहेत. मोबाईलच्या आभासी जगातून विद्यार्थ्यांनी बाहेर यावे मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित राहावे व गुरुजनांनी दिलेल्या प्रत्यक्ष अध्यापनाची अनुभूती घ्यावी असे माता पालक सौ शुभांगी विनोद सपकाळे यांनी मनोगतातून विचार व्यक्त केले. या मोफत बस सेवेचे पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक यांच्याकडून कौतुक होत आहे. टाईप बसचे कुशल व अनुभवी चालक श्री राजेंद्र सपकाळे तसेच वाहक शिपाई श्री संजय झोपे ,श्री अक्षय तायडे योग्य नियोजन करून सेवा देत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!