थोरगव्हाण शिवार तूर पिकाचा हंगाम तेजीत..

थोरगव्हाण तालुका रावेर .प्रतिनिधी –

खान्देश मधील जळगाव जिल्ह्यातील लोक तुर व तूर डाळ यापासून बनवलेल्या अन्नपदार्थांना विशेष महत्व देतात .तुरीपासून बनवलेली ऊसळ, खिचडी ,ओल्या तुर दाण्या पासून बनवलेली हिरवी , लाल मिरच्यांची खमंग भाजी, तुरीच्या डाळीपासून फुणके ,डाळ घालून केलेली डाळ गंडोरी , खान्देशी तूर डाळ घालून केलेल्या विविध भाज्या ,आमटी,खान्देशी तिखट डाळ फ्राय, खान्देशी तुर डाळ पासून बनवलेले वरण बट्टी सोबत खायला प्रसिद्ध आहे .जळगाव जिल्ह्यातील स्वयंपाक घरात पाहुणचार म्हणून गृहिणी या पदार्थांना मानाचे स्थान देतात. आचारी सामूहिक कार्यक्रमात तूर डाळीच्या वरण बट्टीला पसंती देतात. लोक वरील पदार्थ चविष्टपणे खातात एवढे अगणित महत्व तुर पिकाला आहे. खरीप पिकाचा शेवटचा हंगाम म्हणजे तुर थोरगव्हाण तालुका रावेर शेत शिवारात फेरफटका मारला असता सध्या हवामानानुसार तूर पिकाचा हंगाम सध्या प्रगतिशील शेतकरी श्री सुनील दगडू चौधरी यांचे थोरगव्हाण रायपूर तालुका रावेर रस्त्यावरील शेतात तेजीत आहे. कौशल्यपूर्ण मशागत व पेरणीचे चांगले नियोजन या मुळे पिवळ्या धम्म बहारदार फुलांची आरास पाहायला मिळते. काळी कसदार सुपीक जमीन मनसोक्त झालेला परतीचा पाऊस तुर पिकाला पोषक ठरला आहे .साठगुंठे भागामध्ये त्यांनी सलग निर्मल वाण असलेले तूर पिकाची पेरणी केलेली आहे. शेतात महिला मजूरवर्ग यांचे कडून माझी अर्धांगिनी थोरगव्हाण ग्रामपंचायत सदस्य सौ सुनिताताई सुनील चौधरी हया मजूर वर्गाकडून शांत व कुशल स्वभावाने चांगले काम करून घेण्यात नेहमी तत्पर असतात . शेतीत मजूरवर्ग टिकवून ठेवण्यात त्यांचा नेहमी मला फायदा होतो. त्यांच्या शेजारी शेतात प्रगतिशील शेतकरी श्री प्रवीण दादा देविदास पाटील यांनी घरगुती वापरासाठी कमी प्रमाणात ऑरगॅनिक तूर पिकाची लागवड केली आहे. सध्यातरी शेतकरी राजा तुर पिकाचा हंगाम पाहून आनंदी आहे . हवामान असेच अनुकूल राहिले तर तुर पिकातून मोठा नफा मिळू शकतो अशी स्थिती आहे.पुढील भविष्य निसर्गावर अवलंबून आहे. असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले. शेतकरी श्री सुनील दगडू चौधरी यांच्या सत्तर वर्षीय मातोश्री श्रीमती मालताबाई दगडू चौधरी यांनी तुर डाळीचे महत्व विशद केले. त्यांनी सांगितले की तूर डाळी मध्ये पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते तूर डाळीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि व्यक्ती दिवसभर उत्साही राहतो गर्भवती महिलांना तूरडाळीच्या पदार्थांचे सेवन करण्यास डॉक्टर सल्ला देतात त्यामुळे महिलांचे बाळंतपण नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते. श्रीमती दमयंती देवीदास पाटील वय पंच्यांशी यांनी सांगितले की अलीकडील काळात पाईल्स सारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात त्याचे कारण म्हणजे तूर डाळीचा आहारात सामावेश नसणे किंवा कमी असणे हे आहे. पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जात होता त्यावेळी तुरीचे वरण मातीच्या गाडग्यात शिजवले जात होते .गाडग्यात तुरदाळ शिजवत त्यामुळे एसिडिटी चे प्रमाण कमी होते . अति मसालेदार , विविध रंग ,चाचमीत सुगंधी पदार्थ , उपभोक्त्याला भ्रमिष्ट करणारे अजिनोमोटो सारख्या जमान्यात बर्गर पिझ्झा नूडल्स खाण्यात धन्य मारणाऱ्या नवीन पिढीने पूर्वजांनी आहार संस्कृती स्वीकारली होती ती आत्मसात करून दीर्घ आयुष्य व्हावे असा सल्ला दिला आहे .अजही आम्ही वरील तुर डाळ पदार्थांचा समावेश आहारात आवर्जून करतो. चार वर्ष जुनी घरगुती डाळ आम्ही आहारात वापरतो . तूर डाळीचे सेवन करणे हा लोकप्रिय औषध म्हणून ज्येष्ठ नागरिक नेहमीच पसंती देतात . आमच्या या दीर्घायुष्य ,निरोगी शरीराचे रहस्य या आहारात सामावलेले आहे हेच आम्हाला सांगायचे आहे असे मत व्यक्त केले.आजही दोघे शेतकरी बांधव पेरणी प्रसंगी मातोश्रींचा सल्ला घेतात . तुर पिकाचा हंगाम चांगला असल्यामुळे सध्या शेतकरी सुखावला आहे..

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!