महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समारोप कार्यक्रम ..
थोरगव्हाण -(प्रतिनिधी)
थोरगव्हाण येथून जवळच असलेले चुनवाडे येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमित्त महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे प्रतिमेचे दहा दिवसासाठी प्रमुख चौकात प्रतिमा अनावरण करण्यात आले होते. महर्षी वाल्मिकी ऋषी मित्र ,महिला मंडळ चुनवाडे यांचे वतीने सकाळ संध्याकाळ पूजा विविध गाणी व खेळ आनंद घेऊन, घरात रामायणाचे प्रकट वाचन करून उत्सव मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला. महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी रामायण सारख्या महान ग्रंथाची निर्मिती करून जो आदर्श अखिल मानव समाजाला दिला आहे त्या आदर्शाचे पालन उपस्थितांनी आपल्या समाज जीवनामध्ये करावे आदर्श ठेवावा. असे मांगी येथील सरपंच सविताताई सपकाळे यांनी आवाहन केले. चुनवाडे येथे मांगी चुनवाडे ग्रुप ग्रामपंचायत असल्या मुळे दोनही गावातील नागरिकांनी हा उत्सव अभिमानाने साजरा केला. माता भगिनी व लहान मुलींनी रामायणातील वेशभूषा साकारल्या व भक्तिमय वातावरण निर्माण केले. अतिशय आनंदी व प्रसन्न वातावरण या उत्सवामध्ये पाहावयास मिळाले. सर्वांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे नावाचा,कार्याचा एकच जयघोष केला. चुनवाडे गावचे पोलीस पाटील दिपक भाऊ सपकाळे, समाज सेविका कार्यकर्त्या सुनीता ताई सपकाळे, उषा सोनवणे ,दुर्गाबाई सपकाळे , रेखा सपकाळे, शकुंतला सोनवणे, मांगी चुनवाडे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सौ सविताताई सपकाळे,उपसरपंच फकीरा भाऊ कोळी मांगी, रोजगार सेवक विकास सोनवणे ,ललित गोपाळ चौधरी, राजेंद्र सपकाळे ,रमेश पाटील ,मांगी गावचे पोलीस पाटील सोपान कोळी, अमोल झाल्टे, तुळशीराम सोनवणे, सोपान सपकाळे. यांचेसह समस्त ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.