शेतकर्याना मार्गदर्शक आपले सरकार सेवा केंद्र …
थोरगव्हाण ता. रावेर (प्रतिनिधी)
थोरगव्हाण तालुका रावेर येथे कोरोना आपत्ती काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी बंधू ना तसेच पंचक्रोशीतील गावांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेणाऱ्यांना गावातच ऑनलाईन सुविधांचा फायदा मिळावा या हेतूने प्रेरित होऊन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे या सेवा केंद्रा मार्फत शासनाच्या सर्व ऑनलाइन सेवा पुरवल्या जातील शेतकऱ्यांसाठी शेताचा सातबारा उतारा ,आधार कार्ड प्रिंट ,डिजिटल स्वाक्षरी, उद्योग आधार विविध शैक्षणिक दाखले, पॅन कार्ड सरकारी दरात फी घेउन सेवा दिली जाते. कॉमन सर्विस सेंटर च्या वतीने मोफत दिलेल्या सेवा , श्रम व हेल्थ कार्ड नोंदणी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना विषयक माहिती थोरगव्हाण तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी समर्थ सेवा आपले सरकार केंद्र सेवा ,मार्गदर्शन देत आहे . सदर केंद्र ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन चौधरी यांनी केंद्र सुरू करण्याची प्रेरणा दिली . ग्रामस्थां सह पंचक्रोशीतील लोक या केंद्राचा लाभ घेत आहे. गरजू ग्राहकांची कामानिमित्त ये जा सुरू असते . या सेवेतून शासनाला महसूल ही प्राप्त होतो .असे समर्थ सेवा केंद्र प्रमुख उमेश खंडू कोल्हे व संचालक नम्रता उमेश कोल्हे यांनी कळविले आहे .