देशमुख विद्यालयात पोलिस स्मृती दिन संपन्न..
थोरगव्हाण प्रतिनिधी -(युवराज कुरकुरे)
रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे आज २१ ऑक्टोबर शहीद पोलिस स्मृती दिन यानिमित्त देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण येथे पोलीस स्मृती दिना निमित्त डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी शहीद पोलीस उपनिरीक्षक शहीद सिताराम पुनाजी चौधरी मुळगाव मांगी ,तालुका रावेर हे तुमसर जिल्हा भंडारा येथे वेगळ्या विदर्भाची मागणी साठी १९७३ रोजी जे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते त्या आंदोलनातील गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करत असताना ,कायदा सुव्यवस्था राखतांना जमाव नियंत्रणात आणताना शाहिद झाले या निमित्त विद्यालयात शहीद सिताराम पुनाजी चौधरी मुळगाव मांगी यांच्या फोटोचे पूजन करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला . या साठी सावदा पोलिस स्टेशन चे सहकार्य मिळाले. शाहिद सीताराम पुणाजी चौधरी ७ मे१९४४ पोलिस दलात भरती झाले १ मे १९७३ मधे ते शाहिद झाले आजही त्यांच्या परिवारातील सदस्य पोलीस दलात सेवारत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण पाटील ,थोरगव्हाण गावचे पोलीस पाटील श्री अरविंद दादा झोपे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सत्यनारायण वैष्णव, पर्यवेक्षक श्री दंगल पाटील ,समर्थ केंद्राचे श्री मधुकर बाऊस्कर यांनी शहीद सिताराम पुनाजी चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पगुच्छ अर्पण केले व त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. गावचे पोलीस पाटील श्री अरविंद दादा झोपे, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री दंगल पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सत्यनारायण वैष्णव, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सन्मानीय शालेय समिती सदस्य श्री प्रवीण दादा पाटील या सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना देशभक्तीचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाची स्तुती केली .वाःड्मय मंडळ च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले गेले .सांस्कृतिक समिती प्रमुख श्री युवराज कुरकुरे यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले .श्री योगेश कोष्टी ,सौ. शीतल तायडे ,श्री निलेश देशमुख ,शिक्षक प्रतिनिधी श्री सुधाकर सपकाळे, कलाशिक्षक संजीव सपकाळे ,श्री तुळशीराम घुले,श्री किरण चौधरी ,श्री प्रशांत कचरे ,खेळ शिक्षक श्री जितेंद्र चौधरी, सौ जयश्री चौधरी,श्री मिलिंद पाटील ,सौ नयना पाटील ,श्री किरण पाटील,श्री संदीप पाटील, वरिष्ठ लिपिक श्री रवींद्र चौधरी, कनिष्ठ लिपिक श्री रामभाऊ वानखेडे, शिक्षकेतर कर्मचारी श्री संजीव झोपे,श्री राजू भाऊ सपकाळे, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..