ज्वारी काढणी कार्य प्रगतीपथावर शेत शिवारात आले यात्रेचे स्वरूप..
थोरगव्हाण प्रतिनिधी –
थोरगव्हाण येथून जवळच असलेल्या मांगी येथील शेत शिवारात खरीप हंगामानंतर रब्बीच्या हंगामाची तयारी कामी शेतकरी व्यस्त. शेतकरी ज्वारी काढण्यासा साठी धडपड करत आहे .नुकताच परतीच्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान खाते अंदाजानुसार सोळा व सतरा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी राजा हाती आलेला ज्वारीचा घास तयार करून आपल्या ताब्यात कसा घेता येईल यासाठी प्रयत्नशील आहे असे दिसून येत आहे. मांगी शिवारात विलास विलास राणे यांचे दोन एकर शेतात पहिल्या दिवशी हायब्रीड कापणे व हातोहात लाणी करणे (कनिस खोडणे )मळणी करणे कार्य प्रगती पथावर आहे .ज्वारीची मळणी भागवत बाऊस्कर यांच्या मळणी यंत्राने तयार करण्यात आली व फैजपूर येथील चाऱ्याचे व्यापारी ओल्या चाऱ्याची कुट्टी त्याच दिवशी मोठ्या ट्रक मध्ये पाडणे एकदम तातडीने नियोजन पूर्वक कार्य सुरू आहे. विलास राणे यांनी सांगितले की पुढील रब्बीच्या हंगामाची तयारी साठी घाई गडबड सुरू आहे लगेच उद्या ट्रॅक्टर ने टीलर करून पुढील हंगाम हरभरा किंवा धना लागवडीचे उद्दिष्ट आहे अलीकडील काळात शेतीचा खंड( रेंट) वाढलेला आहे प्राप्त परिस्थितीचा फायदा घेऊन दोन हंगामाचे उद्दिष्टपूर्ती करणे शेतकऱ्यांसाठी जिकरीचे होत आहे शेतकऱ्यांना खेळ हंगामा पूर्वी द्यावी लागते. त्यासाठी रोख खेळत्या भांडवलाची गरज भासते. ऐन शेवटच्या परतीच्या पावसामुळे मोत्यासारख्या चमकणाऱ्या ज्वारीचे काळ्या ज्वारीत रूपांतर झाले. त्यामुळे निश्चितच भाव कमी मिळणार व येणारा नफा कमी होईल. जीवाला खूप दुःख झाले नैसर्गिक शेती कसण्यात अनेक धोके, अनिश्चितता निर्माण होतात त्यापैकीच ही एक स्थिती आहे. सध्या ज्वारीला उन्हात कोरडी करून वाढीव भाव मिळेल तेव्हा विक्रीचा मानस आहे.असे मनोगत शेतकरी विलास राणे यांनी व्यक्त केले.