थाळनेर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

थाळनेर प्रतिनिधी (हेमंत कोळी)

थाळनेर, येथील कै. अण्णासाहेब पितांबर शंकर वाडीले कला महाविद्यायात ग्रंथालय विभाग, मराठी विभाग ,एन एस एस विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग तसेच आय. क्यू. ए. सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी राष्ट्रपती डॉ. ए‌.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जे. गावित यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. कलाम यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन राष्ट्रपती पदापर्यंत त्यांच्या जीवनाची झालेली वाटचाल याबाबत प्रभारी प्राचार्य डाॅ.गावित यांनी मार्गदर्शनपर माहिती दिली. डॉ. कलाम यांच्या म्हणण्यानुसार माझी जयंती – वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात यावी यामागील हेतू लक्षात घेता वाचनानेच खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनाची प्रगती होते असे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. विजय झुंजारराव यांनी मत मांडले. यावेळेस विद्यार्थी विकास सहाय्यक अधिकारी प्रा. सतिश बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. हितेंद्र माळी यांनी आभार व्यक्त केले .यावेळी प्रा. महेश रणदिवे, प्रा. सुभाष राठोड व प्राध्याकेत्तर कर्मचारी वर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!