सलून व्यवसायिक आज साजरा करीत आहे ‘नॅशनल सलोन डे”….

त-हाडी प्रतिनिधी –

सलून व्यवसाय,नाभिक समाजाचा प्रामुख्याने पारंपरिक व्यवसाय.
आजही आपल्या राज्यासह देशभरातील नाभिक समाज याच व्यवसायात पारंगत असताना दिसत आहे.वेळोवेळी शासकीय सुविधांपासून वंचित राहिलेल्या या समाजातील जवळ जवळ ८० टक्के लोक आजही हाच पारंपरिक व्यवसाय मोठ्या कुशलतेने सांभाळून सेवा दानाचे महान कार्य अविरत करीत आहेत.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने सलून व्यवसायाचे सर्वात जास्त नुकसान झाले होते. या महामारीने अनेक सलून व्यवसायिकांचे संसार उध्वस्त केले होते.कित्तेक व्यवसायिकांनी तर आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून या जगाचाच निरोप घेतला होता.
कोरोणाच्या लॉकडाऊन दरम्यान सलून वाल्यांचे उत्पन्नाचे साधनच खुंटले होते.त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याने ते मदतीसाठी रस्त्यावर उतरले होते.पण अशा संकटकाळात देखील हवालदिल झालेल्या सलून व्यवसायिकांना एकाही राजकारण्यांनी अथवा राजकीय पक्षाने मदत केली तर नाही अथवा त्यांची साधी दखलही घेतली गेली नाही.
पण याच दरम्यान सेव्ह सलोन इंडियाची चळवळ उदयास आली आणि देशभरातील सलून व्यवसायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.इथेच खरी आणि सलून ब्युटी पार्लर व्यवसायिकांच्या ऐक्याला सुरुवातहीझाली.राज्यातीलच नव्हे तर देशभरातील सलून व्यवसायिक विविध संघटनांच्या मार्फत आपल्या मागण्यांसाठी एकवटून आला आणि एकाच दिवसात जवळ जवळ दीड लाखाच्या वर निवेदने सरकारला देण्यात आली.
हा दिवस म्हणजे सलून ब्युटी पार्लर व्यवसायिकांच्या व्यवसायात ऐक्याची ऐतिहासिक क्रांती घडविणारा दिवस होता.
तो दिवस होता ११ ऑगस्ट २०२१….
याच ऐतिहासिक दिवसामुळे सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला ऐक्याची एक नवीन ओळख मिळाली आणि गटातटात विभागलेला देशभरातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिक सेव्ह सलोन इंडियाच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी एकवटून आला.
सलून व्यवसायिकांच्या वतीने गेल्या वर्षीही देशभरात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करून सलून व्यवसायातील ऐक्याचे दर्शन साऱ्या जगाला घडविले होते.
महत्वाची बाब म्हणजे या क्षेत्रासाठी नुकतीच नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर दि. ४ जुलै रोजी “HBF” (हेअर ब्युटी फेडरेशन इंडिया)ची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे.
HBF हे सलून व्यवसायाचे अधिकृत फेडरेशन असून प्रथमच यावेळी देशभरातील सलून आणि ब्युटी सेवा देणारे नामवंत कलाकार,उद्योजक,आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सामील यात झाले होते.
एचबीएफ मुळे देशभरातील सलून व्यवसायाला स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.देशभरातील अलग सलग संघटनांचे आणि असोसियेशनचे अस्तित्व अबाधित ठेवून एचबीएफ सकल सलून व्यवसायाचे प्रतिनिधित्व करणार आहे.सलून व्यवसायिकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि व्यवसायातील समस्या शासकीय पातळीवर मांडून या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न एचबीएफ करणार आहे.
यामुळे या वर्षी सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून देशभरातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिक आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. आजच्या दिनी सर्व सलून व्यवसायिक एकमेकांना शुभेच्छा देऊन आपल्या ग्राहक राजाचे स्वागत करताना आपल्या ऐतिहासिक दिनाचे महत्व सर्वांना सांगण्यास सज्ज आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!