आदिवासी संघर्ष समिती कार्यकर्ता मेळाव्याचे पालक मंत्र्यांना निमंत्रण:-

तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि(राजेश वसंत रायमळे)

आदिवासीं संघर्ष समिती जळगांव मार्फत शेगांव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे मा. पालक मंत्र्याना निमंत्रण देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यातील १ कोटी ३० लाख अनुसूचित जमाती पैकी १ कोटी आदिवासींना संसदेने१९७६ पासूनदिलेल्याआरक्षणाच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यातआलेले आहेत, तसेच राज्य व केंद्रसरकाच्या विविध योजनांचा सुद्धा लाभ मिळत नाही त्यामुळे या समूहांमध्ये शासनाविषयी तिव्र नाराजी असून या प्रश्नाला वाचा फोडण्याच्या दृष्टिकोणातून दि.०७ नोव्हेंबर २०२१ रविवार रोजी संतभूमी शेगांव येथे आदिवासी संघर्ष समितीचा एक दिवसीय कार्यकर्ता मेळावा होणार असून त्याबाबत आदिवासी संघर्ष समिती जळगांव मार्फत शासकीय विश्रामगृह जळगांव येथे मा.ना. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री जळगांव यांना निमंत्रण देण्यात आले.यावेळी आदिवासी संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष मा.श्री नितीन कांडेलकर,जिल्हा सरचिटणीस मा.श्री विश्वनाथ कोळी, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री सुकलाल सांगळकर,रावेर तालुका अध्यक्ष मा. श्री मनोहर कोळी,मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मा.श्री संजय कांडेलकर,युवा तालुकाध्यक्ष मा.श्री चंद्रकांत कोळी,रावेर तालुका उपाध्यक्ष श्री राहुल कोळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!