तामसवाडी ता.रावेर येथे महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी..
तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी – ( राजेश वसंत रायमळे )
तामसवाडी ता.रावेर येथे महर्षी वाल्मिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, तामसवाडी ता.रावेर येथे रामायण या महाकाव्याचे रचनाकार आद्यकवी रामायणकार ज्यांनी घडण्यापूर्वीच रामायण लिहीले असे पुजनिय आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने मजी उपसरपंच नरेंद्र कोळी यांनी महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार व
पुष्प अर्पण करून अभिवादन केले.तसेच आपले मनोगत व्यक्त करीत महर्षी वाल्मिक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आपले मनोगत व्यक्त करीत असतांना ते म्हणालेत की,महर्षी वाल्मिक यांनी रामायणासारखे आदर्श वाङ्मय उपलब्ध करून दिलेले आहे, अखिल मानव समाजाने त्याचा आदर्श घेऊन जीवन व्यतीत केल्यास आयुष्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.यावेळेस गावातील अनेक मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.